लग्नानंतर १२ दिवसांनीच उचललं टोकाच पाऊल; बीडमध्ये तरुण तलाठ्याने केली आत्महत्या

पत्नी ड्यूटीवर गेलेली असताना गणेश कोळी यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

News Photo   2026 05 26T165545.426

बीडच्या अंबाजोगाईतील मोरेवाडी (Ambajogai) परिसरात एका नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंबाजोगाईतील मोरेवाडी या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत होते. गणेश दत्तू कोळी असं मृत तरुणाचं नाव असून ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत होते. अवघ्या १२ दिवसांपूर्वीच मृत गणेश कोळी यांचा विवाह झाला होता.

अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीने त्यांची पत्नी कार्यरत आहे. पत्नी ड्यूटीवर गेलेली असताना गणेश कोळी यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. अवघ्या १२ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुण तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोरेवाडी परिसरात उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली.

साहेब, मी अजून जिवंत असतानाच मृत का दाखवलं,बीडमध्ये बोगसगिरीने गाठलं टोक

गणेश दत्तू कोळी असं मृत तरुणाचे नाव असून ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी हे पत्नीसमवेत अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांची पत्नी अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे. घटनेच्या वेळी पत्नी ड्युटीवर गेली असताना गणेश यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. नवविवाहानंतर इतक्या कमी कालावधीत घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गणेश कोळी यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अनेक तर्क-वितर्क लावलं जात आहेत.

follow us