घरात कुणी नसल्याचं पाहून महिलेवर बलात्कार, आरोपीचं कराड गँगशी कनेक्शन

या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अजूनही आरोपी अमर बांगर याला अटक करण्यात आलेली नाही.

Beed Rape

बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडच्या सहकाऱ्याच्या मुलानं एका 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. अमर बांगर असं आरोपीचं नाव आहे, त्याच्याविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये.

महिलेच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने या 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केला आहे. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अजूनही आरोपी अमर बांगर याला अटक करण्यात आलेली नाही. घटनेबाबत अधिक तापस सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी अमर बांगर हा पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा आहे.

follow us