पहिल्या पत्नीशी घटस्फोट, वडिलांनी आणली दुसरी बायको, मुलाने साधला डाव…शेवट कसा झाला?

बीड जिल्ह्यात सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाचा दुर्देवी शेवट झाल्याची घटना घडलीयं. नैराश्येतून मुलाने औषध पिऊन आत्महत्या केली तर प्रियकराचा धक्का बसून प्रेयसीनेही आत्महत्या केलीयं.

Untitle (59)

Son & stepmother Love Story : नातेसंबंधाची चौकट तोडून एका सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाने (Son & stepmother Love Story )दुर्देवी शेवट झाल्याची घटना बीडच्या केज तालुक्यात घडलीयं. आपल्या प्रेमसंबंधाबद्दल सर्वांनाच समजल्याने भीतीपोटी नैराश्येतून मुलाने विषारी औषध पिऊन स्वत:ला संपवलं. तर प्रियकराच्या मृत्यूचं समजताच सावत्र आईनेही झाडाला गळफास लावून आत्महत्या केलीयं.

सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा झटका! पुणे-नाशिकमध्ये दरवाढ, पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅसही महाग

केज तालुक्यात एका 40 वर्षीय व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने 4 वर्षांनंतर दुसरं लग्न केलं. संसाराचा गाढा सुरळीत सुरु असतानाच पहिल्या पत्नीच्या मुलाचे आणि सावत्र आईचं सुत जुळलं. हे सुत इतकं जुळलं की दोघेही घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले.

पत्नी आणि मुलाचा काही एक तपास लागत नसल्याने वडिलांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत सावत्र आई आणि मुलाला तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतलं. आपल्या प्रेमसंबंधाबाबत सर्वांनाच समजले, या भीतीपोटी आणि नैराश्येतून मुलाने विषारी औषध प्राशन केले. अनेक दिवस रुग्णालात मृत्यूशी झुंज देत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तर मुलाची प्रेयसी अर्थात सावत्र आईला या घटनेची बातमी कळताच तिनेही झाडाला गळफास लावून आत्महत्या केलीयं.

मिलिंद नार्वेकरांचा फडणवीसांना मध्यरात्री फोन, विधान परिषद निवडणुकीला ठाकरे फडणवीस जवळीक वाढली

दरम्यान, झाडाला गळफास लावून घेतल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने डॉक्टर पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनाा केला. या घटनेनंतर दोघांनीही आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावल्याची चर्चा नागरिकांमधून होत असल्याचं दिसून आलं.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सर्वांसमक्ष पंचनामा केला. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत.

follow us