Pankaja Munde : ..तर मी पंकजा मुंडेंना CM करेन ! महादेव जानकरांचा भाजपला इशारा
Pankaja Munde : एकेकाळी भाजपाचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) आता सरळसरळ भाजपाची कोंडी करू लागले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचे भाजपशी खटके उडू लागल्याने त्यांनी आता थेट पंगा घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा वक्तव्य करून भाजपाच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. जानकर काल अमरावती जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रीय समाज पक्षाचे 145 आमदार निवडून आले तर मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेन, असे जानकर म्हणाले. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानला आहे. या नात्याने पंकजा या माझ्या बहिण आहेत. आमच्या पक्षाचे जर 145 आमदार निवडून आले तर मी माझ्या बहिणीलाच मुख्यमंत्री करेन अशी घोषणा त्यांनी केली.
Pankaja Munde : पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर.. भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा
आम्ही ज्यावेळी भाजपाचे मित्र पक्ष होतो त्यावेळी तुमचा पक्ष भाजपात विलीन करा असे सांगितले होते. परंतु, आम्ही तसे केले नाही. आम्ही होतो म्हणून भाजपाचं सरकार आलं. पश्चिम महाराष्ट्रात तर भाजपला कुणीही ओळखत नाही, असेही जानकर म्हणाले. यावेळी पक्षाचे अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले उपस्थित होते.
पंकजांना जास्त त्रास झाला तर..
दरम्यान, जुलै महिन्यात नगर दौऱ्यावर असताना महादेव जानकरांनी भाजपला स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये जास्त त्रास होईल तेव्हा साडी चोळी घेऊन घ्यायला जाईन. पंकजा या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्या माझ्या बहिण आहेत. राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून काय ती जबाबादारी मी देईन. मात्र सध्या दिल्या घरी सुखी राहा इतकेच मी पंकजा मुंडे यांना सांगेन. ज्यावेळी पंकजांना भाजपमध्ये त्रास होईल तेव्हा मी बहिणीला साडी चोळी घेऊन घ्यायला जाईल, अशा शब्दांत जानकर यांनी भाजपाला इशारा दिला होता.
Mahadev Jankar : भाजपकडे मंत्रिपद मागणार नाही, त्यांना वाटलं तर देतील किंवा नाही देणार!
भाजपबरोबर गेलो हीच मोठी चूक
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आपण भारतीय जनता पक्षाबरोबर आलो होतो मात्र, मुंडे याच्या जाण्याने मी पोरका झालोय. मात्र आगामी काळात भाजपला त्यांची जागा दाखवून देणार आहे. माझा पक्ष हा आगामी काळात भाजपमध्ये विलीन करण्याचे षडयंत्र रचले जात असले तरी ते आपण होऊ देणार नाही. आगामी निवडणुकीत स्वबळावर सर्व जागा लढवणार असून भाजपाबरोबर जाणे ही सर्वात मोठी चूक होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा जानकर यांनी कर्जत (जि. नगर) येथील जनस्वराज्य यात्रेवेळी दिला होता.