Ajit Pawar यांनी दावा ठोकलेल्या जागांवर 2014 अन् 2019 मध्ये कुणी मारली होती बाजी?

Ajit Pawar यांनी दावा ठोकलेल्या जागांवर 2014 अन् 2019 मध्ये कुणी मारली होती बाजी?

Ajit Pawar : अजित पवार यांनी (Ajit Pawar ) राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा अजित पवार गट लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुढील (Elections 2023) टप्प्यातील चर्चा होईल, अशा स्पष्ट शब्दांत उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) रणशिंग फुंकले. राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar ) गटाचं मुंबईतील कर्जतमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. त्यामध्ये अजित पवार बोलत होते. मात्र अजित पवारांनी दावा ठोकलेल्या राष्ट्रवादीच्या या जगांवर 2014 अन् 2019 मध्ये कुणी मारली होती बाजी? जाणून घेऊ…

‘थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चं मराठीत पदार्पण; ‘आईच्या गावात मराठीत बोल’मध्ये साकारणार मुख्य भूमिका

‘त्या’जागांवर 2014 अन् 2019 मध्ये कुणी मारली होती बाजी?

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागांवर 2014 अन् 2019 मध्ये काय-काय झालं होतं? त्यामध्ये साताऱ्यामध्ये 2014 च्या लोकसभेला त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये असलेले उदयनराजे भोसले हे विजयी झाले होते. त्यांनी त्यावेळी भाजप-शिवसेना युतीच्या माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटलांचा पराभव केला होता. तर 2019 ला पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यातच लढत झाली होती.

श्रीनिवास पाटलांनी उदयन राजेंचा पराभव केला…

तर पुढे उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. त्यावेळी राष्ट्रवादीने भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे विरोधात शरद पवारांचे निकटवर्तीय असेलेले श्रीनिवास पाटील यांना उभ केलं. ही पोटनिवडणूक गाजली ती शरद पवारांच्या पावसातील सभेमुळे. कारण त्यानंतर या पोटनिवणुकीमध्ये श्रीनिवास पाटलांनी उदयन राजेंचा पराभव केला होता. देशात मोदी लाट असताना देखील शरद पवारांचा करिष्मा येथे चालला. विधानसभेवर देखील परिणाम झाला होता.

Jitendra Awhad : ‘नवीन पक्ष काढा, कर्तुत्व सिद्ध करा’; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत आव्हाडांचं अजितदादांना चॅलेंज!

सुप्रिया सुळेंच बालेकिल्ल्यातच मताधिक्य घटलं…

बारामती म्हणजे जो पवार कुटुंबाचा गड मानला जातो. त्याठिकाणी 2014 च्या लोकसभेला ला सुप्रिया सुळेच विजयी झाल्या होत्या. त्यांना भाजपसोबत महायुती केलेल्या रासपच्या महादेव जानकारांनी लढत दिली होती. जानकारांचा पराभव झाला खरा. मात्र या निवडणुकीत पवार आणि राष्ट्रवादीच्या चिंतेचा विषय बनला होता. कारण यावेळी सुप्रिया सुळेंच बालेकिल्ल्यातच मताधिक्य घटलं होतं.

सुळे यांना सुनेत्रा पवार लढत देणार असल्याच्या चर्चा

पुढे 2019 ला सुळेंना भाजपच्या कांचन कुल यांनी कडवी लढत दिली होती. मात्र बारामतीमध्ये पवारांना पर्याय नाही. यानुसार भाजपच्या कुल यांना पराभूत करत. सुप्रिया सुळेच विजयी झाल्या. तर यावेळी सुळे यांना स्वतः अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढत देणार असल्याच्या चर्चा आहे. तर अजित पवार यांनी बारामतीची जागा लढणार असल्याचं म्हणत त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केलं आहे.

Sanjay Raut : अजितदादा नाही ही भाजपाचीच स्क्रिप्ट; शरद पवारांसाठी राऊत मैदानात

शिवसेनेच्या अढळराव पाटलांनी बाजी मारली होती…

त्यानंतरची राष्ट्रवादीची लोकसभेची जागा म्हणजे शरद पवार गटात असलेले अमोल कोल्हे यांचा मतदारसंघ शिरूर येथे 2014 ला शिवसेनेच्या अढळराव पाटलांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या देवदत्त कामत यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर 2019 ला राष्ट्रवादीने थेट अभिनेते आणि प्रसिद्ध टीव्ही चेहरा असलेल्या अमोल कोल्हे यांनाच शिवसेनेच्या अढळराव पाटलांविरोधात मैदानात उतरवलं होतं. त्यात अढळराव पाटलांचा पराभव झाला.

Uddhav Thackeray : ‘आवळा देऊन कोहळा काढण्याची सरकारची हातचलाखी’; दरवाढीवर ठाकरे गटाचा टोला

सुनील तटकरे यांनी पराभवाचा वचपा काढला

पुढची जागा म्हणजे रायगड जी जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये असेलेले सुनील तटकरे यांच्याकडे आहे. या ठिकाणी 2014 ला सुनील तटकरे यांचा शिवसेनेच्या अनंत गिते यांनी पराभव केला होता. त्यावेळी ही लढत अटीतटीची झाली होती. देशात मोदी लाट होती. दुसरीकडे भाजप शिवसेना युती होती. मात्र 2019 ला सुनील तटकरे यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढला त्यांची लढत यावेळी देखील गिते यांच्याशीच झाली. त्यात तटकरेंनी गितेंचा पराभव केला.

शरद पवार गटाचं टेन्शन वाढलं…

त्यामुळे अजित पवार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या चारही जागांवर उमेदवार देणार असल्याचं सांगितलं आहे. ज्यामध्ये तटकरेंचा रायगड सोडलं तर साताऱ्याचे श्रीनिवास पाटील , सुप्रिया सुळे आणि शिरूरचे अमोल कोल्हे हे शरद पवार गटामध्ये आहेत. त्यांच्याविरोधात अजित पवारांना शड्डू ठोकल्याने शरद पवार गटाचं टेन्शन वाढलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज