‘विरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे..,’; ‘बारामती लढवणार’ म्हणणाऱ्या दादांना ताईंचं उत्तर

‘विरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे..,’; ‘बारामती लढवणार’ म्हणणाऱ्या दादांना ताईंचं उत्तर

Supriya Sule On Ajit Pawar : माझ्या विरोधात कुणीतही लढलंच पाहिजे, हा माझा आग्रह राहिलायं, बाकी महाराष्ट्र अन् बारामतीची मायबाप जनता ठरवेल, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांना उत्तर दिलं आहे. लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणी अजितदादांनी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली. त्यावरुन आता वादंग पेटणार असल्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : ‘भाजपनं नाकारलं म्हणून अनिल देशमुखांनी साथ सोडली’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्रातील नागरिक असून कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी मनापासून याचं स्वागत करते, कारण ही लोकशाही असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित-विराटची सुट्टी, कोणावर जबाबदारी?

तसेच आमची नाती एका जागेवर आहेत आणि राजकारण वेगळं आहे. प्रोफेशन आणि नात्यात कधीच गल्लत करायची नसते. मी लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा केली. लोकशाहीत कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. यात काहीही गैर नाही. माझ्याविरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे, हा माझा आग्रह राहिला आहे. बाकी महाराष्ट्र आणि बारामतीतील मायबाप जनता ठरवणार असल्याचं” सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

चिंता वाढली! उत्तराखंडमधील दोन मुलांमध्ये आढळली चीनमध्ये पसरलेल्या नव्या आजाराची लक्षणे

ही लढाई नाहीतर दोन वेगळे विचार…
मी लोकप्रतिनिधी आहे, मी लोकांची सेवा करण्यासाठीच राजकारणात आली आहे. ही लढाई नाही, तर दोन वेगळे विचार आहेत. लोकसेवा आपला विचार असेल तर लढाई वेगैरे काही नसतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

वाद पेटला! दत्ता दळवींच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड; ठाकरे गट आक्रमक, ‘जशास तसं उत्तर..,’

काय म्हणाले होते अजितदादा?
मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित यंदा अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. नवीन सरकार आल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी व्हावेत ही आपल्या सगळ्यांची धारणा आहे. त्यासाठी राज्यात जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या ज्या चार जागा आहेत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपण लढवणारच असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube