वाद पेटला! दत्ता दळवींच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड; ठाकरे गट आक्रमक, ‘जशास तसं उत्तर..,’

  • Written By: Published:
वाद पेटला! दत्ता दळवींच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड; ठाकरे गट आक्रमक, ‘जशास तसं उत्तर..,’

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळव (Datta Dalvi) यांच्या गाड्यांची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर काही अज्ञात लोकांनी भांडुप येथील त्यांच्या इमारतीत घुसून त्यांच्या गाडीची तोडफोड केली.

UNLF Signs Peace Accord : मणिपूरचा सर्वात जुन्या बंडखोर गट UNLF ने हिंसा सोडली; शांतता करारावर केली सही 

दत्ता दळवी यांनी एका कार्यक्रमात बोलातांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिविगाळ केली होती. त्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. दळवी यांनी केलेल्या टीकेनंतर पोलिसांनी त्यांना आज सकाळी अटक केली त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर हा वाद शमण्याची शक्यता होती. मात्र, आता चार-पाच अज्ञातांनी दळवी यांच्या निवासस्थानी दाखल होऊन गाडीच्या काचा फोडल्या आहेत. दगडाने व लाकडाने गाडीवर हल्ला करून काचा फोडण्याचत आल्या. दळवी यांच्या वक्तव्यानंतर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे ही तोडफोड शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

‘निकष बाजूला ठेवा, कागदी घोडे न नाचवता जेवढं नुकसान झालं, तेवढी मदत करा’; थोरात आक्रमक

काय आहे दत्ता दळवी यांचे वक्तव्य?

रविवारी भांडुपमध्ये शिवसेनाचा (उबाठा) कोकण पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदेंवर ऐकेरी भाषेत टीका केली. ते म्हणाले, आज मिंधे गट आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की, गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंदे सरकार या ठिकाणी आरूढ झाले आहे. आज दिघे साहेब असते तर एकनाथ शिंदेंना चाबकाने फोडून काढलं असतं. आम्ही सगळ बघितलं आहे. एकनाथ शिंदे काय होते? हे मी स्वतः पाहिले आहे. पण ते बाळासाहेबांच्या जवळ आले. बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला. ते उद्धवजींच्या जवळ आले, उद्धवजींनी त्यांना जवळ घेतले, मात्र, त्यांनी गद्दारी केली, अशी टीका दळवी यांनी केली. स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेतात, अरे भोस** हिंदूहृदयसम्राटाचा अर्थ माहित आहे का, असंही दळवी म्हणाले होते.

दळवी यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याची आमची संस्कृती नाही. बाळासाहेब ठाकरेंची ही शिवकण नाही. सरकारवरटीका करणे हा एकमेव कार्यक्रम त्यांच्याकडे आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जशास तसं उत्तर देऊ
दरम्यान, दळवी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. यानंतर आमदार सुनील राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली. तोडफोड करणाऱ्यांची नावे आम्हाला समजली आहेत, येत्या 24 तासांत पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्हीही जशास तसं उत्तर देऊ, असे सुनील राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube