UNLF Signs Peace Accord : मणिपूरचा सर्वात जुन्या बंडखोर गट UNLF ने हिंसा सोडली; शांतता करारावर केली सही

UNLF Signs Peace Accord : मणिपूरचा सर्वात जुन्या बंडखोर गट UNLF ने हिंसा सोडली; शांतता करारावर केली सही

UNLF Signs Peace Accord : मणिपुरमधून एक मोठी घडामोड समोर आली आहे. सर्वात जुना बंडखोर गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहा(Amit Shah) यांनी याबाबत एक्सवर माहिती दिली आहे. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून या गटावर बंदी घातल्यानंतर युनायटेड नॅशनल लिबरेशनने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Uttarakhand Tunnel : देवदुतांकडून मजुरांचा कोंडलेला श्वास मोकळा; प्रत्येकी 50 हजारांचं बक्षीस

मंत्री अमित शाहा पोस्टमध्ये म्हणाले, “एक ऐतिहासिक कामगिरी झाली आहे. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने आज नवी दिल्लीत शांतता करारावर स्वाक्षरी केल्याने ईशान्येत शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. मणिपूरचा सर्वात जुना खोऱ्यातील बंडखोर गट यूएनएलएफने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केले आहे. मी त्यांचे लोकशाही प्रक्रियेत स्वागत करतो आणि शांतता आणि प्रगतीच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो”, असं अमित शाहा म्हणाले आहेत.

Gold Price : लग्नसराईच्या सुरुवातीलाच वाढलं टेन्शन; सर्व विक्रम मोडत सोन्याला मिळाला उच्चांकी दर

तसेच दुसर्‍या पोस्टमध्ये शाहा म्हणाले, आज भारत सरकार आणि मणिपूर सरकारने UNLF सोबत केलेल्या शांतता कराराने सहा दशकांच्या बंडखोर चळवळीचा अंत झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या आणि ईशान्य भारतातील तरुणांना चांगले भविष्य प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं अमित शाहांनी स्पष्ट केलं आहे.

Sambhajiraje Chhatrapati : 25 राज्यांत 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण मग महाराष्ट्रात का नाही? संभाजीराजेंचा सवाल

13 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातलेल्या मणिपूरच्या 9 मेईतेई गट आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांमध्ये UNLF देखील समाविष्ट आहे. त्यांच्या देशविरोधी कारवाया आणि सुरक्षा दलांवरील प्राणघातक हल्ल्यांमुळे ही बंदी घालण्यात आली होती. मणिपूरमध्ये हे गट सक्रिय आहेत. ही बंदी 13 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाली होती. त्यानंतर युएनएलएफने हिंसाचार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

HT च्या रिपोर्टनुसार,UNLF वर बंदी लागू झाल्यानंतर काही दिवसांनी हा शांतता करार झाला. मणिपूरमधील सुरक्षा दल, पोलीस आणि नागरिकांवरील हल्ले आणि हत्या तसेच भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांमध्ये या संघटनेचा सहभाग होता. त्यामुळेच केंद्र सरकारकडून बंदीचा निर्णय घेण्यात आला. UNLF हा मणिपूरमधील सर्वात जुना मेतैई बंडखोर गट असून त्याची स्थापना 24 नोव्हेंबर 1964 रोजी झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube