Gold Price : लग्नसराईच्या सुरुवातीलाच वाढलं टेन्शन; सर्व विक्रम मोडत सोन्याला मिळाला उच्चांकी दर

Gold Price : लग्नसराईच्या सुरुवातीलाच वाढलं टेन्शन; सर्व विक्रम मोडत सोन्याला मिळाला उच्चांकी दर

Gold Price Today : दिवाळीचा वर्षातील मोठा सण झाल्यानंतर आता लग्नसराईचा (Gold Price Today) हंगाम सुरू झाला आहे. विवाहसोहळा म्हटल्यानंतर सोन्याची खरेदी होतेच. परंतु, यंदा मात्र सोन्यासाठी जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. कारण, आज सोन्याने बाजारपेठेत उच्चांकी दर गाठला आहे. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 62 हजार 600 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याबरोबरच चांदीची चमकही वाढली आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दराचा हा उच्चांकच आहे. ऐन लग्नसराईत भाववाढ झाल्याने सोने खरेदीसाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळात विवाह मुहूर्त आहेत. मात्र त्याआधीच सोन्या चांदीच्या भावात वाढ होत आहे.

Uttarakhand Tunnel Rescue : ‘सुरुवातीचे 24 तास आमच्यासाठी’.. कामगाराने सांगितलं 17 दिवसात काय घडलं?

सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू असून या काळात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लग्नसमारंभात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना जादा किंमत द्यावी लागेल. जागतिक बाजारपेठेतील चढ उतार, 2024 मध्ये जागतिक मंदी येण्याची भीती, डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी, जगभरातील बँकांकडून सोन्याची खरेदी तसेच वाढती महागाई या काही कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.  मे महिन्यानंतर पहिल्यांदाच सोन्याचे दर इतके जास्त वाढले आहेत. अमेरिकी फेडरल रिजर्व बँक पुढील वर्षात व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.

गुंतवणुकदारांसाठी नोव्हेंबर ठरला सोन्याचा 

तसे पाहिले तर गुंतवणूकदारांसाठी नोव्हेंबर महिना फायद्याचाच राहिला आहे. 1 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 60 हजार 896 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तो आता 62 हजार 600 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याच दिवशी चांदीचा भाव 70 हजार 285 रुपये प्रति किलो होता. तो आता 74 हजार 993 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चांदीच्या भावात 4 हजार 168 रुपयांची वाढ झाली आहे.

Uttarakhand Tunnel: बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणारे ‘हिरो

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube