Sambhajiraje Chhatrapati : 25 राज्यांत 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण मग महाराष्ट्रात का नाही? संभाजीराजेंचा सवाल

Sambhajiraje Chhatrapati :  25 राज्यांत 50  टक्के पेक्षा जास्त आरक्षण मग महाराष्ट्रात का नाही? संभाजीराजेंचा सवाल

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी दिल्लीमध्ये मागासवर्ग आयोगाशी चर्चा केली. तसेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट देखील घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी जात निहाय जनगणना तसेच अनेक राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून जास्त असलेल्या आरक्षणावर प्रश्न उपस्थित केला.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

मागासवर्ग आयोगाशी चर्चा झाली त्यामध्ये बिहार सारख जातींच सर्व्हेक्षण संपूर्ण देशात होणार आहे. कारण 25 राज्यांनी 50 टक्क्यांहून जास्त आरक्षण दिलेलं आहे. मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल यावेळी संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला केला आहे.

T20 विश्वचषकासाठी नामिबिया टीम पात्र, एका जागेसाठी ‘या’ तीन संघात चुरस

पुढे पत्रकारांनी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्या वादावर प्रश्न विचारला असता छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, मला या वादामध्ये पडायचं नाही. पण दोन्ही बाजूच्या लोकांना जबाबदारीने वक्तव्ये करावीत. सामाजिक सलोखा बिघडवू नये. तर या आजच्या मागासवर्ग आयोगाशी सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना यावेळी निवेदन देखील देण्यात आल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.

Animal Event: ‘मुंबईचे दिवस गेले, हैदराबादला या! तेलंगणाच्या नेत्याची रणबीर कपूरला ऑफर

तसेच ते म्हणाले की, केंद्र सरकार आरक्षणाची जबाबदारी राज्यावर टाकून रिकामे होऊ शकत नाही. अशी बाजू मी त्या चर्चेत मांडली. त्यावर मागासवर्ग आयोगाचे सदस्यांना हे सर्व मुद्दे पटले आहेत. अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यासााठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा जरांगेंनी पत्रकार परिषदे गेऊन चौथ्या टप्यातील महाराष्ट्र दौऱ्याची माहिती दिली. त्यामुळं जरांगेचं वादळ पुन्हा एकदा महाराष्ट्रात घोंगावणार आहे. त्यांच्याकडून एल्गार सभाचं आयोजन केलं जातं. जरांगेही मागे हटालया तयार नाहीत. तिसऱ्या टप्यातील दौऱ्यानंतर आता त्यांनी चौथ्या टप्यातील दौऱ्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलतांना मनोज जरांगेंनी चौथ्या टप्यातील दौऱ्याची माहिती दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube