Animal Event: ‘मुंबईचे दिवस गेले, हैदराबादला या! तेलंगणाच्या नेत्याची रणबीर कपूरला ऑफर

Animal Event: ‘मुंबईचे दिवस गेले, हैदराबादला या! तेलंगणाच्या नेत्याची रणबीर कपूरला ऑफर

Animal Event: रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म अॅनिमलच्या (Animal Movie) रिलीजपूर्वी सोमवारी हैदराबादमध्ये प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) आणि साऊथ सुपरस्टार यश हे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बीआरएस नेते आणि तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी (Malla Reddy) देखील सहभाग झाले होते. मात्र आता त्यांनी कार्यक्रमात केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून जोरदार चर्चा होत आहे.

या कार्यक्रमात चित्रपट कलाकारांसोबतच हजारो चाहतेही सहभागी झाले होते. यावेळी मल्ला रेड्डी यांनी मंचावरून रणबीर कपूरला सांगितले की, येत्या 5 वर्षांत तेलुगू लोक संपूर्ण भारतावर आणि बॉलिवूड-हॉलीवूडवर राज्य करतील. शिवाय त्याने रणबीर कपूरला असेही सांगितले की, मुंबई आता जुनी झाली आहे आणि एका वर्षात सर्व कलाकारांना हैदराबादला शिफ्ट व्हावे लागणार आहे. मल्ला रेड्डी यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

बीआरएस नेते मल्ला रेड्डी यांनी रणबीर कपूरला सांगितले, “रणबीर जी (रणबीर कपूर), मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. येत्या 5 वर्षांत आपले तेलुगू लोक संपूर्ण बॉलीवूडवर आणि हॉलिवूडवर राज्य करणार आहे. तुम्हालाही वर्षभरानंतर हैदराबादला शिफ्ट व्हावे लागेल, कारण मुंबई जुने झाले आहे. तर बेंगळुरूमध्ये वाहतूक कोंडी झाली. भारतात एकच शहर आहे, ते म्हणजे हैदराबाद.” यादरम्यान मल्ला रेड्डी म्हणाले की, रणबीर तुझा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार आहे. 500 कोटींहून अधिक कमाई करणार, असा विश्वास त्यांनी यावेळी दाखवला आहे.

Kiran Mane: किरण मानेंची अभिनेत्रीबद्दलची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले, “इतर कलाकारांपेक्षा सोनालीने…”

हैदराबादच्या लोकांना हुशार असल्याचे सांगताना मल्ला रेड्डी म्हणाले, “आमचे तेलुगू लोक खूप हुशार आहेत. दिग्दर्शक राजामौली सारखे लोक आहेत. आणि आमचा नवा डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा आला आहे. आमचे लोक संपूर्ण हॉलीवूड आणि बॉलीवूडवर राज्य करणार असल्याचा दावा केला आहे. हैदराबाद आमचे मुख्य स्थान आहे. आमचे तेलुगू लोक हुशार आहेत…स्मार्ट…स्मार्ट लोक आहेत. बघा आमची हिरोईन किती हुशार आहे. पुष्पाने संपूर्ण देशभर खळबळ माजवली होती.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमल हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला खूप पसंती दिली जात आहे. रिलीज झाल्यापासून याला यूट्यूबवर 6 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. येत्या 1 डिसेंबरला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. मात्र, तेलंगणाच्या मंत्र्याच्या या वक्तव्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच वादाची ठिणगी पडताना दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube