Animal Trailer: अनिल कपूर अ‍ॅनिमलच्या ट्रेलर लाँचला का गेले नाही? अखेर समोर आलं सत्य…

Animal Trailer: अनिल कपूर अ‍ॅनिमलच्या ट्रेलर लाँचला का गेले नाही? अखेर समोर आलं सत्य…

Animal Trailer: नुकतचं दिल्लीत आगामी चित्रपट “अ‍ॅनिमल” च्या बहुप्रतिक्षित (Animal trailer launch) भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला आहे. या खास ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चाहत्यांनी दमदार प्रतिसाद दिला. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) या ट्रेलर लाँचला हजेरी लावली नव्हती. (Ranbir Kapoor) याबद्दल आता अखेर सत्य समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir Kapoor (@ranbirkapooronline)


‘अ‍ॅनिमल’ च्या ट्रेलरमध्ये अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांची केमेस्ट्री उठून दिसत असून हा चित्रपट या दोघासाठी नक्कीच खास असणार आहे. ट्रेलरवरून रणबीरने साकारलेला नायकाची भूमिका बघायला मिळाली. अनिल कपूर यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चाहते याबद्दल अनेक चर्चा करत आहेत. सध्या चाहते या ट्रेलरचे भरभरून कौतुक करत आहेत.

अभिनेते अनिल कपूर ट्रेलर लाँचला का आले नाहीत, याबाबत आता रणबीर कपूरने खुलासा केले आहे की, अनिल कपूर कदाचित त्याच्या कामात व्यस्त असतील, म्हणून ते उपस्थित राहू शकले नाही. अनिल कपूर सध्या दुबईत आहेत. हा कार्यक्रम 21 तारखेला होणार होता. परंतु काही कारणांमुळे तो पुढे ढकलला गेला. आम्ही त्यांना या कार्यक्रमासाठी खूप मिस करत आहोत. हा चित्रपट अनिल सरांशिवाय शक्यच झाला नसता. अनिल सर झाकास. असे यावेळी अभिनेताने सांगितले आहे.

Ranbir Kapoor: ‘…तर बायकोने मला मारलं असतं’; रणबीरचं आलियाबद्दलचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

या अगोदर ॲनिमल चित्रपटाच्या टिझरने टाइम्स स्क्वेअरवर देखील धुमाकूळ घातला होता. अमेरिकेमध्ये देखील या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अॅनिमल हा चित्रपट यापूर्वी 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. यामध्ये रणबीरच्या राऊडी लूक बघायला मिळत आहे. त्याच्या डोळ्याला गॉगल दिसत असून अभिनेत्याच्या तोंडामध्ये सिगारेटही पाहायला मिळत आहे. सिनेमातील अभिनेत्याच्या बॉसी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आता हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube