‘किंग’च्या ‘डॅडी कूल’मध्ये शाहरुख-करीनाचा जबरदस्त स्वॅग, 15 वर्षांनंतर पुन्हा पाहायला मिळाली दोघांची शानदार केमिस्ट्री!
सर्वाधिक लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक असलेली शाहरुख आणि करीनाची जोडी तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आली आहे.
Shahrukh-Kareena’s awesome swag in ‘King’s’ Daddy Cool’ : ‘किंग’मधील विविध रंग आणि पैलू सातत्याने प्रेक्षकांसमोर येत आहेत! ‘तू मिल जाए’ या गाण्यातील शाहरुख खानचा रोमँटिक अंदाज आणि दमदार अॅक्शन अवताराने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर, त्याचा बहुप्रतीक्षित चित्रपट आता आपल्या नव्या धमाकेदार गाण्यासह ‘डॅडी कूल (किंग व्हर्जन)’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या या गाण्यात करीना कपूर खानदेखील झळकत आहे. विशेष म्हणजे, या गाण्याच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक असलेली शाहरुख आणि करीनाची जोडी तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आली आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी ही एक खास पर्वणीच ठरणार आहे.
दमदार बीट्स, आकर्षक संगीत आणि शानदार रेट्रो अंदाज यांचा मेळ साधत ‘डॅडी कूल (किंग व्हर्जन)’ हे जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘डॅडी कूल’ या गाण्याला एक नवा बॉलिवूड साज चढवते. या धमाकेदार गाण्यात शाहरुख खान आणि करीना कपूर खान आपल्या जबरदस्त डान्स मूव्ह्जने डान्स फ्लोअरवर अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहेत. शाहरुख खान आपल्या खास शैली, आकर्षण आणि बॉलिवूडच्या पारंपरिक रंगतदार अंदाजाने गाण्यात जान आणतो, तर करीना कपूर खान आपल्या स्टायलिश आणि सदाबहार अंदाजाने दोघांमधील अप्रतिम केमिस्ट्री पुन्हा एकदा जिवंत करते.
परिसीमन विधेयकावर डीएमकेचा यू-टर्न? भाजप सरकारला देणार पाठिंबा, 22 खासदारांच्या भूमिकेकडे लक्ष
बोनी एम. यांच्या जगभरात गाजलेल्या ‘डॅडी कूल’ या सुपरहिट गाण्याचा मूळ गाभा कायम ठेवत, फ्रँक फॅरियन आणि जॉर्ज रेयम यांनी लिहिलेल्या या गाण्याला ‘डॅडी कूल (किंग व्हर्जन)’मध्ये सचिन-जिगर यांनी नव्या संगीतसाजात सादर केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांच्या दमदार आवाजाने या गाण्याची रंगत आणखी वाढवली आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफर वैभवी मर्चंट यांनी आपल्या ऊर्जावान नृत्यदिग्दर्शनाने गाण्याला चार चाँद लावले आहेत. कुमार यांनी या गाण्याचे हिंदी बोल लिहिले आहेत.
अशा प्रकारे मनोरंजनसृष्टीतील अनेक प्रतिभावान कलाकारांनी एकत्र येत या गाण्याला खास बनवले आहे. या गाण्याचे अनावरण मेटाच्या ‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम 2026’ या विशेष कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील 700 हून अधिक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स एकत्र आले होते. त्यामुळे ‘डॅडी कूल (किंग व्हर्जन)’च्या या खास सोहळ्याची रंगत आणखी वाढली.
2027 मध्ये निसर्गाचा प्रकोप? एल निनो ऐतिहासिक उच्चांकाच्या दिशेने, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटांचा इशारा
‘किंग’ चित्रपटाच्या ख्रिसमस रिलीजची तारीख जवळ येत असताना, चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटातील प्रत्येक नवी झलक प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवत असून, ‘किंग’ हा 2026 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे गाणे आता झी म्युझिक कंपनी आणि टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी केली आहे. हा चित्रपट 26 डिसेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.