भारतीय सिनेमाचा अभिमान ‘बूंग’ 6 मार्चला होणार पुन्हा रिलीज, ट्रेलर झाला प्रदर्शित

ट्रेलरमध्ये एक भावनिक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेची झलक पाहायला मिळते, जी भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर वेगळी ओळख देत आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (31)

The pride of Indian cinema, ‘Boong’, will be re-released on March 6th : एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि सूटेबल पिक्चर्स प्रस्तुत समीक्षकांनी गौरवलेली ‘बूंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हीच ती फिल्म आहे ज्याने पहिल्यांदाच भारतीय चित्रपट म्हणून बाफ्टा सन्मान पटकावला. ट्रेलरमध्ये एक भावनिक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेची झलक पाहायला मिळते, जी भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर वेगळी ओळख देत आहे.

हा चित्रपट 6 मार्च रोजी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येत आहे, जेणेकरून प्रेक्षकांना तो थिएटरमध्ये पुन्हा अनुभवता येईल. ‘बूंग’ने 79व्या ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड्समध्ये बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म या श्रेणीत बाफ्टा सन्मान जिंकत इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय पातळीवर असा मोठा मान मिळवणारी ही पहिली भारतीय फिल्म ठरली आहे.

एकनाथ शिंदेंच्याबाबतीतही तोच प्रकार घडणार होता का? आमदार रोहित पवारांकडून प्रश्नांची सरबत्ती…

या चित्रपटाची कथा लेखन आणि दिग्दर्शन लक्ष्मीप्रिया देवी यांनी केले आहे. ही गोष्ट छोट्या बूंगची आहे, जो आपल्या आईला एक खास सरप्राईज द्यायचे स्वप्न पाहतो. त्याला वाटते की दूर राहणाऱ्या वडिलांना पुन्हा घरी आणणे हेच तिच्यासाठी सर्वात मोठे भेटवस्तू ठरेल. वडिलांच्या शोधात निघालेल्या बूंगला अनेक भावनिक क्षणांचा सामना करावा लागतो आणि शेवटी त्याला एक अनपेक्षित भेट मिळते. नवीन ट्रेलरमध्ये या भावनिक प्रवासाची झलक दिसते, जिथे बालपणाची निरागसता आणि खोल भावना एकत्र गुंफलेल्या आहेत.

आपल्या मातीतल्या मुळांशी जोडलेली ही कथा कुटुंब, धैर्य आणि आशा यांचा संदेश देते. ‘बूंग’ अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रदर्शित झाली असून तिला मोठ्या प्रमाणावर दाद मिळाली आहे. बाफ्टा जिंकताना या चित्रपटाने ‘Zootopia 2’, ‘Lilo & Stitch’ आणि ‘Arco’ यांसारख्या चित्रपटांशी स्पर्धा केली, ज्यामुळे तिची जागतिक लोकप्रियता अधोरेखित होते. बाफ्टा जिंकल्यानंतर आता हा चित्रपट ६ मार्च रोजी पुन्हा एकदा सिनेमागृहांत प्रदर्शित होत आहे.

follow us