जाहीर व्यासपीठावर बोलण्यापेक्षा कॅबिनेटसमोर मागणी करा : सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सल्ला
मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या विविध मागण्या माध्यमांपुढे आणि व्यासपीठावरुन करण्यापेक्षा कॅबिनेटसमोर कराव्यात. त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हे कळून येईल. असा सल्ला राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर एकवाक्यता नसल्याची टीकाही केली. काल हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेत बोलताना भुजबळ यांनी न्यायमूर्ती शिंदेंची समिती बरखास्त करावी आणि नव्याने सापडलेल्या कुणबी नोंदींना, प्रमाणपत्रांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी भुजबळ यांना सल्ला दिला. (NCP (Sharad Pawar) faction MP Supriya Sule advises Chhagan Bhujbal regarding Kunbi records)
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
एकतर भुजबळ साहेब वयाने, कर्तृत्वांनी आणि सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठे आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले आहे, एकामेकांच्या सुखदुःखात सहभाही झालो आहोत. त्याच्यामुळे अतिशय विनम्रपणे माझी माध्यमांनाही विनंती आहे की माझे जे काही स्टेटमेंट असेल ते भुजबळ साहेबांचं वय, कर्तुत्व या सगळ्यांचा सन्मान ठेवूनच असेल. त्याच संदर्भाने ते घ्यावे, गैरसमज कुणाचेच नसावे. पण माझी अतिशय प्रांजळपणे, विनम्रपणे भुजबळ साहेबांना एवढीच विनंती करायची की ज्या काही तुमच्या मागण्या आहेत, त्या मागण्या व्यासपीठावर न करतात त्या मागण्या त्यांनी कॅबिनेटमध्ये, बंद दराआड कराव्या.
आताच्या कुणबी नोंदी खडाखोडी करुन शोधल्या : छगन भुजबळांचा शिंदे समितीवर मोठा आरोप
आज महाराष्ट्रात 200 आमदार सत्तेत असताना तुमच्या कॅबिनेट मंत्राला जर बाहेरचे व्यासपीठ लागत असेल तर याचा अर्थ कॅबिनेटमध्ये एकवाक्यता नाही, चर्चेचे गांभीर्य नाही. जी चर्चा कॅबिनेटमध्ये झाली पाहिजे ती दुर्दैवाने आज चॅनेल आणि सत्तेत असलेले लोक सभांमध्ये मांडतात. याचा अर्थ ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये किती मिस मॅनेजमेंट आहे आणि पॉलिसी परालिसीस आहे, हे दिसून येते. कॅबिनेट मंत्री बाहेर येऊन मागण्या करत असतील तर मग कॅबिनेटमध्ये कसली चर्चा होते हे सर्व सामान्य माणसाला कळायला हवे.
आतापर्यंतच्या कुणबी नोंदी स्थगित करा अन् शिंदे समिती बरखास्त करा : भुजबळांची सर्वात मोठी मागणी
महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक आणि उपमुख्यमंत्री दोन यांना विचारले पाहिजे की नक्की तुमच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारची भूमिका काय आहे? एकदा नक्की निर्णय काय हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही पूर्ण ताकतीने त्याच्यावर बोलू. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या ज्या ज्या मागण्यात त्याच्यामागे पूर्ण ताकतीने उभा आहे आणि कुणाचाही सरकार असलं उभा राहील.महाराष्ट्रात आणि दिल्लीत दोन्ही सभागृह आणि संसदेमध्ये ऑन रेकॉर्ड आमच्या या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही भ्रष्ट जुमला पक्षासारखे बोलत नाही. महाराष्ट्र धनगरांना आरक्षण द्या म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड संसदेमध्ये नाही म्हणतात, असा टोलाही सुळे यांनी लगावला.