ना बारामती, ना माढा! संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभा लढवायला आवडेल; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

  • Written By: Published:
ना बारामती, ना माढा! संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभा लढवायला आवडेल; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

Supriya Sule : आगामी वर्षात देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. सर्वच पक्ष आतापासूनच लोकसभेची तयारी करत आहेत. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मनातील राजकीय इच्छा बोलून दाखवली. कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल, असं विधान सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केलं. राष्ट्रवादीतील गट-तटाच्या पेचामुळं सुळे यांनी केलेलं विधान सर्वांच्या भुवया उंचावत आहेत.

‘त्या’ आरोपीचे अनेक नेत्यांसोबत फोटो, मग त्यांनीही प्रोत्साहन दिलं? जयंत पाटलांचा राणेंना सवाल 

सुप्रिया सुळे आज वर्ध्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी वर्ध्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मनातील राजकीय इच्छा बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, वर्ध्याशी माझे भावनिक नाते आहे. माझी कर्मभूमी बारामतीच असणार आहे. पण, वध्येच्या मातीशी माझे भावनिक नाते आहे, ते मला शब्दात मांडता येणार नाही. वर्षातून किमान दोनदा माझी गाडी वर्ध्याला वळते, असं सुळे यांनी सांगितले.

हार्दिक गुजरातकडून अन् रोहित मुंबईकडूनच खेळणार! पहा रिलीज अन् रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी

कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल, आपण हे पक्षाला अनेकदा सांगितल्याचेही त्यांनी म्हटलं. पुढं बोलतांना त्या म्हणाल्या, माझा अदृश्य शक्तींवर विश्वास आहे. आमच्याकडे अजूनही घड्याळाचे चिन्ह आहे. मे महिन्यापर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असेही सुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर समोर काय होतं, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटाचं प्राबल्य पाहता बारामतीत सुळेंची कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ वर्षानुवर्षे राखून ठेवला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे बारामतीतून नव्हे तर माढा येथून निवडणूक लढण्याचा मानस व्यक्त करू शकल्या असत्या. मात्र, त्यांनी वर्ध्यातून खासदारकी लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यार बोलतांना विद्यमाना आमदार रामदास तडस म्हणाले की, कदाचित सुप्रिया सुळेंना वाटत असेल की मी बारामतीतून निवडून येऊ शकत नाही, म्हणून वर्ध्यातून निवडणूक लढवावी. मात्र वर्धा लोकसभा मतदारसंघात बाह्य उमेदवार स्वीकारत नाहीत.वर्धेतून बाहेरूचा उमेदवार लढला तर मोठ्या फरकाने हरतो, असं तडस म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube