‘अजित पवार गटाला पक्षावर ताबा हवाय म्हणून हा सगळा कट’; शरद पवार गटाच्या वकिलांचा आरोप

  • Written By: Published:
‘अजित पवार गटाला पक्षावर ताबा हवाय म्हणून हा सगळा कट’; शरद पवार गटाच्या वकिलांचा आरोप

NCP Crises : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावरच खटला ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, या मुद्द्यावरून शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात मोठा संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर या संदर्भात सुनावणी झाली आहे. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. यावेळी देवदत्त कामत यांनी हा अध्यक्ष पदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे, त्यासाठी हा कट रचला गेला, असा आरोप केला.

Ahmednagar Crime : एजंट्सची अरेरावी वाढली, सही केली नाही म्हणून आरटीओ कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला… 

देवदत्त कामत यांनी युक्तीवाद करतांना म्हटलं की, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आघाडी म्हणून निवडणूक लढवली. यामध्ये 54 आणि 44 आमदार विजयी झाले. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली. अजित पवार यांचा पक्ष विस्तारात कोणतेही योगदान वा भूमिका नाही.

अ‍ॅक्शन सीन्सचा थरार, रोमँटिक अंदाज अन्…; प्रियांशु पैन्युलीच्या ‘शेहर लखोत’ चा ट्रेलर आउट 

शरद पवारच अध्यक्ष
ते म्हणाले, आतापर्यंत केवळ शरद पवार हेच स्थायी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. शरद पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे, या प्रस्तावावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वाक्षरी केली आहे. यानंतर शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आले. आणि आता मात्र, ते शरद पवार यांच्या निवडीला बेकायदेशीर संबोधत आहेत. मात्र, शरद पवार यांनीच पक्षाचा विस्तार केला. ते निर्विवाद अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळं त्यांच्या त्यांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही, असं देवदत्त कामत यांनी स्पष्टपणे सांगितले.

पक्षावर ताबा मिळण्यासाठी कट
सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवार यांना राष्ट्र्वादी कॉंग्रेसवर दावा सांगितला आहे, असं शरद पवार गटाने आयोगात म्हटलं आहे. ही पक्षांतर्गत फूट नाही. सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. अजित पवार यांना पक्षाची सर्व सत्ता हवी आहे. म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे पक्षाची कोणतीही अधिकृत जबाबदारी देखील नव्हती, त्यांनी पक्ष विस्तारासाठी काही काम केलं नाही, असं देखील कामत यांनी शरद पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करताना सांगितलं.

दरम्यान, आता पुढची सुनाणी ही बुधवारी होणार आहे. त्यावेळी अजित पवार गटाकडून युक्तीवाद केला जाणार आहे. त्यामुळं आता   निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव कोणत्या गटाला मिळतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube