अ‍ॅक्शन सीन्सचा थरार, रोमँटिक अंदाज अन्…; प्रियांशु पैन्युलीच्या ‘शेहर लखोत’ चा ट्रेलर आउट

अ‍ॅक्शन सीन्सचा थरार, रोमँटिक अंदाज अन्…; प्रियांशु पैन्युलीच्या ‘शेहर लखोत’ चा ट्रेलर आउट

Shehar Lakhot Trailer Released: प्रियांशू पैन्युली (Priyanshu Panuli) अभिनीत “शेहर लखोत” (Shehar Lakhot Movie) चा बहुप्रतिक्षित ट्रेलर शेवटी चाहत्यांच्या भेटीला आला असून हा ट्रेलर निओ-नॉयर कथा दाखवणार असल्याचे बघायला मिळत आहे. (Shehar Lakhot Trailer ) हा ट्रेलर नक्कीच एक गेम चेंजर ठरणार असणार आहे. सध्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

देव तोमरची मुख्य भूमिका घेऊन पेन्युली अनोख्या अंदाजात दिसणार असून तो नेव्हिगेट भूमिका साकारणार असल्याची माहिती संहार आली आहे. ही वेब सिरीज नवदीप सिंग यांनी दिग्दर्शित केली असून ती Amazon Prime वर रिलीज करण्यात येणार आहे. निओ-नॉइर शैलीमध्ये कॉमेडी असलेली ही वेब सीरिज नक्कीच काहीतरी अनोखी असणार आहे.

प्रियांशू पैन्युलीचा अनोखा लूक आणि उत्कृष्ट कामगिरी यामधून अनुभवयाला मिळणार आहे. “यू-टर्न” सारख्या उल्लेखनीय प्रकल्पांनी त्याचे वैविध्यपूर्ण अनोखा अभिनय कौशल्य दाखवून दिले आहेत. “पिप्पा” आणि “चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली” मधील अतिशय प्रभावी कामगिरीने ओटीटी स्पेस अगोदरच जिंकल्यानंतर प्रियांशू पैन्युली आता “शेहर लखोत” मध्ये चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी लवकरच सज्ज होणार आहे.

‘अरुंधतीने गायलेल्या गाण्याची झलक अन् बरच काही… ‘होऊ दे धिंगाणा 2’ चा धमाकेदार प्रोमो व्हायरल

तसेच नेटफ्लिक्स’वर गाजलेल्या ‘एक्स्ट्रॅक्शन’सिनेमातील क्राईम लॉर्ड ते अॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूरच्या दुसऱ्या भागातील रॉबिन… अभिनेता प्रियांशू पैन्युली याने अल्पावधीतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओळख मिळवली आहे. ‘चलो, ये भी ठीक है’ हा डायलॉग रॉबिनच्या तोंडी प्रचंड गाजला होता. गर्लफ्रेण्ड वंदना जोशीसोबत तो नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube