‘अरुंधतीने गायलेल्या गाण्याची झलक अन् बरच काही… ‘होऊ दे धिंगाणा 2’ चा धमाकेदार प्रोमो व्हायरल

‘अरुंधतीने गायलेल्या गाण्याची झलक अन् बरच काही… ‘होऊ दे धिंगाणा 2’ चा धमाकेदार प्रोमो व्हायरल

Hou De Dhingana 2 Latest Promo:
स्टार प्रवाहवरील ‘होऊ दे धिंगाणा 2’ हा (Hou De Dhingana 2) कार्यक्रम सध्या चर्चा विषय बनला आहे. कारण टीआरपीच्या (TRP) शर्यतीमध्ये हा कार्यक्रम कायम पहिल्या स्थानावर असतो. सिद्धार्थ जाधवचं (Siddharth Jadhav) सुत्रसंचालन या कार्यक्रमाला अतिशय रंजक बनवत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक भागामध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)


‘होऊ दे धिंगाणा 2’ सिरीयलची सोशल मीडियावर (Social Media) मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या भागाला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता ‘होऊ दे धिंगाणा 2’ कार्यक्रम घराघरात बघितला जात आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.  ‘होऊ दे धिंगाणा 2’ च्या मंचावर येत्या शनिवारी ‘आई कुठे काय करते’ आणि ‘अबोली’ या सिरियलची टीम हजेरी लावणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. तसेच कार्यक्रमामध्ये ‘झिम्मा 2’ ची टीमदेखील सहभाग नोंदवणार आहे.

या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो खूप जास्त मजेशीर असणार आहे. प्रोमोत अरुंधती गाणं गात असल्याचे बघायला मिळत आहे. प्रोमोच्या सुरु झाल्यावर सिद्धार्थ जाधव, मधुराणी प्रभुलकर, हेमंत ढोमे आणि सचित पाटील बघायला मिळत आहे. यामध्ये सिद्धार्थ जाधव अरुंधतीला म्हणतो की, ‘आपल्याकडे नऊ रस आहेत. जो रस मी म्हणेन, त्या रसात तू गाणं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर सिद्धार्थ म्हणतो की, रौद्ररस… यावर अरुंधती मोठ्या आवाजात राग दाखवत कसं काय पाटील बर हाय का..? हे गाणं गात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर सिद्धार्थने सांगितले आहे की, शृगांर रस. त्यानंतर अरुंधती जरा हळुवार आवाजात गाणं गात आहे. यावेळी सर्वजण तिची मज्जा घेत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तिला हास्य रसात गाणं म्हणायला लावले आहे. त्यावर ती जोरजोरात हसायला सुरुवात करते. या प्रोमोमध्ये सर्व कलाकार खूप जास्त मज्जा करत असल्याचे बघायला मिळत आहेत.

होय! ‘म्हातारपणी डान्स करणं कठीणचं’, ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी फटकारलं

‘होऊ दे धिंगाणा 2’ या कार्यक्रमाच्या येत्या भागात ‘झिम्मा 2’ चे कलाकार गोंधळ घालताना दिसणार आहेत. प्रमोशनसाठी हे कलाकार हटक्या अंदाजात एन्ट्री करणार आहेत. या कार्यक्रमाच्या येत्या भागात खूप जास्त गोंधळ घालत मज्जा केल्याचे दिसत आहे. येत्या भागात सिद्धार्थ चांदेकर कलाकारांकडून कोणते नवे खेळ घेणार असल्याचे बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube