Video : पोलिसांनी घरात कोंडून मारलं; आळंदीतील घटनेची वारकऱ्याने सांगितला आपबिती
Ashadhi Wari : पंढरपूरच्या वारीसाठी रविवारी श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. मात्र, यावेळी पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात येत असून, आता पोलिसांनी घरात कोंडून मारल्याचा दावा एका वारकऱ्याने केला आहे.
जम्मूत गुंजणार ‘जय महाराष्ट्र’! CM शिंदेंच्या प्रयत्नांना यश, मुंबईत पोहचण्यापूर्वीच मिळाली जमीन
पोलिसांच्या या कृतीमुळे पंढरपूर वारीला काहीसे गालबोट लागले. त्यानंतर आता आळंदीत काल (दि. 11) रोजी नेमकं काय झालं याची आपबिती एका वारकऱ्याने ऑन कॅमेरा बोलून दाखवली आहे.
सालाबादाप्रमाणे वारकऱ्यांना प्रस्थानला सोडण्यात यावं, यासाठी आम्ही प्रस्थान सोहळ्यात उपस्थित होतो. यावेळी आम्ही कोणालाही काहीही न बोलता, प्रस्थानासाठी पुढे जात होतो. तेव्हाच आम्हां चार विद्यार्थी वारकऱ्यांना लोकांमध्ये नाहीतर एकांतात घेऊन 20 पोलिसांनी बेदम मारहाण केलीय. विशेष म्हणजे आम्हाला एका जणाच्या घरात नेऊन पोलिसांनी मारहाण केली, असल्याचा दावा वारकऱ्यांनी केला आहे.
आषाढी वारीसाठी दरवर्षी पालखी प्रस्थान सोहळ्यात सर्वच वारकऱ्यांना सोडलं जातं. अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे. मात्र, यंदाच्या वर्षी आम्हाला पोलिसांनी घरात कोंडून मारलं आहे. या प्रकरणावर आज आम्ही काही बोललो नाहीतर इथून पुढील काळात वारकऱ्यांवर असंच पोलिस प्रशासन मारहाण करतील, असा दावा या वारकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, आम्हाला प्रस्थानला सोडा, या कारणासाठी आम्ही पालखी सोहळ्यात होतो, दरवर्षी पोलिस प्रस्थानाला सोडत असतात. मात्र, यावर्षी पोलिसांनी आमच्या हात उचलला आहे. पोलिसांनी आम्हांला कोंडून मारण्याच कारण काय होतं, ते स्पष्ट करावं, अशी मागणी आळंदीमध्ये पालखी सोहळ्यात मारहाण झालेल्या विद्यार्थी वारकऱ्यांनी केली आहे.