होय! ‘म्हातारपणी डान्स करणं कठीणचं’, ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी फटकारलं

होय! ‘म्हातारपणी डान्स करणं कठीणचं’, ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी फटकारलं

Aishwarya Narkar Troll : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणजे ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar). दोघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक अनोखी चहात निर्माण केली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश दोघेही सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. अनेक वेगवगेळे रील आणि फोटो ते शेअर करत असल्याचे पाहायला मिळत असतात. दरम्यान, ऐश्वर्या नारकर पुन्हा एकदा नव्या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. यावर आता अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. म्हणाल्या की, म्हातारपणी डान्स करणं कठीणचं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)


ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर डान्स करतानाच व्हिडओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या एका कार्यक्रमासाठी डान्सचा सराव करत असल्याचे दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “डान्स हा खऱा स्ट्रगल आहे.” ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. एका युजरने कमेंट करत ऐश्वर्या नारकर यांना “आजी देव देव करा” अशी कॉमेंट्स केल्याचे दिसत आहे. या युजरला ऐश्वर्या नारकर यांनी “अरे बाळा, तुझ्या देवाने तुला सद्बुद्धी नाही का दिली?” असं म्हणत जोरदार फटकारलं आहे. तर आणखी एका युजरने “ऐश्वर्या नारकर गैरहजर असणार देव सदबुद्धी वाटताना” अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्याने कमेंट करत “काशीला जायच्या वयात डान्स करणारी आज्जी. आज्जी जोमात बाकी सगळे कोमात”, असे कॉमेंट्स करत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

Animal Trailer: अनिल कपूर अ‍ॅनिमलच्या ट्रेलर लाँचला का गेले नाही? अखेर समोर आलं सत्य…

दरम्यान, या व्हिडीओवर इतर युजर्सनी देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करत ऐश्वर्या नारकर यांच्या डान्सचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने देखील या व्हिडीओवर इमोजी सेंड करत व्हिडीओला लाईक केलं आहे, तर अनेक सेलिब्रिटींनी देखील या व्हिडीओवर अप्रतिम, सुंदर अशी कमेंट केल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube