Taali Teaser Released: तृतीयपंथीयांचा संघर्ष उलगडणारा ‘ताली’ वेबसीरिजचा टीझर आऊट

Sushmita Sen Taali teaser Out: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने ही आता (Sushmita Sen) ओटीटी विश्वामध्ये अधिराज्य गाजवत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुष्मिताच्या ‘आर्या’ या वेबसिरीजला चाहत्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला होता. आता अभिनेत्रीची आगामी ‘ताली’ (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता तृतीयपंथी गौरी सावंतच्या (Gauri Sawant) भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. ‘ताली’चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
View this post on Instagram
‘ताली’ ही हटके वेबसीरिज येत्या १५ ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तृतीयपंथ्यांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ही वेबसीरिज असल्याचे सांगितले जात आहे. गौरी सावंतच्या भूमिकेमध्ये सुष्मिताला बघण्यासाठी चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहात असल्याचे दिसत आहेत. ‘ताली’ या टीझरच्या सुरुवातीला गौरी सावंतच्या भूमिकेमध्ये सुष्मिता म्हणत आहे की, “नमस्कार मी गौरी. तुमची श्री गौरी सावंत. जिला कोणी हिजडा बोलतं, तर कोणी सामाजिक कार्यकर्ती, कोणी नाटकी म्हणवतं, तर कोणी गेम चेंजर. ही गोष्ट हाच सर्व प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे.
‘गाली से ताली तक”, “स्वाभिमान, सन्मान आणि स्वतंत्रता मला या तिन्ही गोष्टी पाहिजे आहेत, असे संवाद या टीझरमधून दिसत आहे. सुष्मिताने या सीरिजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. टीझर शेअर करत तिने सांगितले आहे की, “गाली से ताली पर्यंतचा प्रवास”. ‘ताली’चा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुष्मिता सेनच्या ‘ताली’ या सीरिजचा टीझर चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरला असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. अप्रतिम, आता प्रतीक्षा फक्त तालीची, तू एक प्रेरणा आहेस, तुझा खूप अभिमान वाटतो, प्रेरणादायी ‘ताली’, अशा कमेंट्स सध्या चाहते करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Video : अन् अनिल कपूरच्या जर्मन चाहत्याने रस्त्यावर लावलं ‘राम लखन’ चं गाणं पाहा…
ही बहुचर्चित सीरिज १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. रवी जाधव दिग्दर्शित या सीरिजचं लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केल्याचे समजत आहे. ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये ६ एपिसोड असणार असल्याचे सांगितले जात आहे. तृतीयपंथीयांचा संघर्ष उलगडणाऱ्या या सीरिजची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. सुष्मिताच्या आगामी सिनेमाची आणि वेब सीरिजची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.