Salman Society: मराठी चित्रपट ‘सलमान सोसायटी’ च पार्टी दणाणली धमाकेदार गाणं प्रदर्शित

Salman Society: मराठी चित्रपट ‘सलमान सोसायटी’ च पार्टी दणाणली धमाकेदार गाणं प्रदर्शित

Salman Society Song Release Out: ‘सलमान सोसायटी’ (Salman Society ) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) या चित्रपटातील एक सॉन्ग आज प्रदर्शित (Song Release Out ) करण्यात आले असून ‘पार्टी दणाणली…’ असे या गाण्याचे बोल असून पुष्कर लोणारकर, गौरव मोरे, शुभम मोरे आणि (Social media) विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.

‘सलमान सोसायटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत करत आहेत. ‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे.

‘पार्टी दणाणली’ हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि नागेश मोरवेकरने गायले आहे. अमित बाइंग ने कोरियोग्राफ केले आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.

बाल कलाकार पुष्करने या आधी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘बाजी’, ‘रांजण’, ‘चि .व चि .सौ. का’, ‘फिरकी’ आणि ‘टी. टी. एम. एम’ झोंबीवली चित्रपटात अभिनय केला आहे तर शुभम मोरेने हिंदी चित्रपट ‘रईस’मध्ये बालपणीच्या शाहरुख़ खानची भूमिका बजावली. तसेच ‘हाफ टिकिट’, ‘फास्टर फेणे’ जर्नी सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने ‘हाफ टिकिट’, ‘ताजमहल’ आणि ‘येरे येरे पावसा, माउली’मध्ये भूमिका केल्या आहेत.

Madhuri Dixit: धकधक गर्लच्या मराठी सिनेमाची घोषणा; पंचक चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पहुण्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटा मध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ”पार्टी दणाणली’ हे गाणे रसिकांना भुरळ पाडेल हे नक्की आहे. आता उत्सुकता आहे चित्रपटाच्या ट्रेलर ची जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रजक्ता एंटरप्राइजेस आणि विडियो पॅलेस प्रस्तुत ‘सलमान सोसाइटी’ 17 नोव्हेंबर 2023 दिवशी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube