दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित-विराटची सुट्टी, कोणावर जबाबदारी?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित-विराटची सुट्टी, कोणावर जबाबदारी?

IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची (India) घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत आज निवड समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत T20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बैठकीत निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विरोट कोहलीला(Virat Kohli) एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-20 आणि एकदिवसीय सामन्याला मुकणार असून दोघेही कसोटी मालिकेत खेळणार आहेत.

एकदिवसीय सामन्यांसाठी के.एल. राहुलवर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीयं. तर टी-20 सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सुर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरु असून शमी खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने होणार आहे. त्यानंतर 17 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहेत. तर 26 डिसेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे.

‘पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं’; धनंजय मुंडेंनी सांगितली अंदर की बात

संजू सॅमसनची भारतीय एकदिवसीय संघात निवड झाली असून दुखापतीतून सावरलेल्या रजत पाटीदारला भारतीय वनडे संघात स्थान मिळाले आहे. सूर्यकुमार यादव सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने त्याला भारतीय वनडे संघातून विश्रांती देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला स्थान मिळालेले नाही तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांचा समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादवची भारतीय टी-२० संघात निवड झाली.

कसोटीसाठी भारतीय संघात कोण?
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड़, ईशान किशन, केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

टी-20 साठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन, जितेश शर्मा, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ :
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सैमसन, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, दीपक चाहर

पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी संघ :
केएस भरत (कर्णधार), साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन*, देवदत्त पडिक्कल, प्रदोष रंजन पॉल, सरफराज खान, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकुर, पुलकित नारंग, सौरभ कुमार, मानव सुथार, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, विधवाथ कावेरप्पा, तुषार देशपांडे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube