लाईव्ह सामन्यात वीज पडली; एका खेळाडूचा मृत्यू, सहा जण जखमी

लाईव्ह सामन्यात वीज पडली; एका खेळाडूचा मृत्यू, सहा जण जखमी

Lightning in football match : ब्राझीलमधील (Brazil) एका शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ‘सँटो अँटोनियो दा प्लॅटिना’ शहरात लाईव्ह फुटबॉल (Football match)सामन्यादरम्यान वीज पडली. मैदानाच्या मध्यभागी पडलेल्या या विजेमुळे एका 21 वर्षीय फुटबॉलपटूचाही मृत्यू झाला. इतर 6 खेळाडूही जखमी झाले आहेत. या सहा खेळाडूंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना 10 डिसेंबर रोजी जोस एल्युटेरियो दा सिल्वा स्टेडियमवर यूनिआओ जेरेन्स आणि यूनिडोस फुटबॉल क्लब यांच्यात सामना खेळला जात होता. हा सामना ‘Amateur Cup’ अंतर्गत सुरू होता.

विजेचा कडकडाट होताच खेळाडू मैदानात पडले
सामन्यादरम्यान अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. यानंतर फुटबॉल मैदानावरच वीज कोसळली. येथे खेळाडू मैदानाबाहेर परतण्याच्या तयारीत असतानाच त्यांना विजेचा धक्का बसला.

अनेक खेळाडू मैदानावर पडले. ‘युनिआओ जेरेन्स फुटबॉल क्लब’चा खेळाडू कायो हेन्रिक डी लिमा गोन्साल्विस यांचे निधन झाले. अन्य खेळाडूची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा खेळाडू शहराबाहेरील प्रादेशिक रुग्णालयात दाखल होता. अन्य चार खेळाडूंवर सध्या शहरातील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Photos : मोहन यादवांच्या शपथविधीला शिंदे-फडणवीस अन् पवार भोपाळला; पाहा फोटो

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंचे व्हिज्युअल्स अंगावर काटा आणणारे आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की स्टेडियममध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि येथे उपस्थित काही प्रेक्षक जोरजोरात ओरडत आहेत. अनेक जण मैदानावर पडलेल्या खेळाडूंना उचलतानाही दिसत आहेत.

Parliament : देशाच्या संसदेवर ‘गॅस’अ‍ॅटॅक? सभागृहात धुरच धुर करणारा ‘स्मोक बॉम्ब’ म्हणजे काय?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube