Photos : मोहन यादवांच्या शपथविधीला शिंदे-फडणवीस अन् पवार भोपाळला; पाहा फोटो

मध्य प्रदेशमध्ये तब्बल 17 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. दुपारपर्यंत कुठेही चर्चेत नसलेले मोहन यादव (Mohan Yadav) मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत.

मोहन यादव यांच्या मुख्यमंत्रिपदाचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (13 डिसेंबरला) मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये पार पडणार आहे.

या शपथविधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हजेरी लावली आहे.

यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य मान्यवरांची त्यांनी भेट घेतली
