Lok Sabha Security Breach : संसदेत कशी दिली जाते एन्ट्री; जाणून घ्या, पास मिळण्याची प्रोसेस
Lok Sabha Security Breach : देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या कामकाजावेळी (Lok Sabha Security Breach) दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरले आणि त्यातील दोघे लोकसभेतील बाकांवर इकडून तिकडे पळत होते. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एकाने बुटातून काही तरी गॅस काढला आणि तो लोकसभेत स्प्रे केला. यामुळे उपस्थित खासदारांच्या नाकात जळजळ सुरू झाली. दरम्यान, या घटनेने लोकसभेत एकच खळबळ उडाली असून या दोन्ही व्यक्तींना सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले आहे. ते कोण आहेत त्यांच्याकडे पास होते का? याची कसून चौकशी केली जात असतानाच इतक्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतही घुसखोरी झालीच कशी, लोकसभेत सामान्य लोकांना एन्ट्री कशी मिळते, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
कुणालाही संसदेत प्रवेश मिळतो का?
संसदेत कधीही कुणालाही प्रवेश मिळू शकत नाही. संसदेत जायचे असेल तर त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. संसेदत सर्वसामान्यांच्या प्रवेशाबाबत अद्याप काही नोटिफिकेशन नाही. मात्र संसदेच्या कामकाजादरम्यान नागरिकांना येथे येता येऊ शकते. या लोकांना प्रेक्षक गॅलरीत बसण्याची सोय आहे.
पुन्हा चुकला काळजाचा ठोका! संसदेत घुसलेल्या तिघांमुळे 21 वर्षांपूर्वीच्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या
एन्ट्री कशी होते ?
संसदेचे कामकाज पाहण्यासाठी यायचे असेल तर त्यासाठी एक एन्ट्री पास तयार करावा लागतो. ग्रुप आणि वैयक्तिक या दोन्ही प्रकारात पास बनवता येतो. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेगळा पास तयार केला जातो. पास बनविण्याचे काम संसद सचिवालयाकडून केले जाते. तसेच कोणत्याही खासदारामार्फत संसदेत जाता येते. यासाठी संबंधित खासदाराला विनंती केल्यास त्याच्या शिफारशीवर संसदेत प्रवेश मिळू शकतो. आताही लोकसभेत ज्यांनी घुसखोरी केली ते एका खासदाराच्याच शिफारस घेऊन आल्याचे समोर येत आहे.
जर संसदेतील म्युझियम पहायला जायचं असेल तर यासाठी सरळ प्रवेश दिला जातो. यासाठी वेगळा पास तयार करण्याची गरज नाही. सुट्टीचे दिवस वगळता अन्य दिवशी येथे प्रवेश मिळतो. मात्र, यासाठीही आधी परवानगी घ्यावी लागते. येथे संसद आणि पंतप्रधानांशी संबंधित महत्वाच्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. नव्या संसद भवनात नागरिकांच्या प्रवेशासाठी अद्याप काही व्यवस्था तयार करण्यात आलेली नाही.
Video : संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक; कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ