Smoke Bomb : संसदेवर ‘गॅस’अॅटॅक? सभागृहात धुरच धुर करणारा ‘स्मोक बॉम्ब’ म्हणजे काय?
Parliament : देशाच्या संसदेच्या (Parliament) कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ उडाली आहे. या तीन व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरले. त्यांनी सभागृहात ‘स्मोक बॉम्ब’ सोडला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र ‘स्मोक बॉम्ब’ म्हणजे काय? पाहूयात…
‘स्मोक बॉम्ब’ म्हणजे काय?
नावाप्रमाणेच स्मोक बॉम्ब हा धुर निर्माण करणारा एक बॉम्ब आहे. अशा प्रकारचे फटाके दिवाळी आणि सणसमारंभांना वापरले जातात. गेल्या काही दिवसांपासून या फटाक्यांचा ट्रेंड आला आहे. हेच फटाके स्मोक बॉम्ब आज (13 डिसेंबरला) संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरूणांनी धुर निर्माण करण्यासाठी वापरले.
पुन्हा चुकला काळजाचा ठोका! संसदेत घुसलेल्या तिघांमुळे 21 वर्षांपूर्वीच्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या
हा स्मोक बॉम्ब जुन्या काळात जपानमध्ये देखील हे बॉम्ब वापरल्या सांगितलं जात. तर 1848 मध्ये ब्रिटिश संशोधक रॉबर्ट येल यांनी स्मोक बॉम्बचा शोध लावला. त्यामध्ये चीनी पद्धतीचा वापर केला जातो. तर धुर जास्त वेळ टीकण्यासाठी त्यामध्ये काही बदलही करण्यात आले आहेत. सध्या या स्मोक बॉम्बमध्ये विविध प्रकार पाहायाला मिळतात.
Lok Sabha : संसदेबाहेरही धुराचे लोळ! लातूरचा तरुण दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
त्यामध्ये रंगीत धुर निर्माण करणारे स्मोक बॉम्ब असतात. असाच रंगीत स्मोक बॉम्ब आज (13 डिसेंबरला) संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरूणांनी धुर निर्माण करण्यासाठी वापरले. त्याचा रंग पिवळा होता. तसेच संसदेच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पकडण्यात आलं. तेव्हा देखील अशाच प्रकारचा धुर पाहायाला मिळाला.
पन्नूने आठवड्याभरातच धमकी खरी ठरवली?
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने याने सहा डिसेंबर रोजी एका व्हिडीओच्या माध्यमातून 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल, अशी धमकी दिली होती. भारतीय यंत्रणांनी मला मारण्याचा कट रचला पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी संसदेवर हल्ला करून याचे उत्तर दिले जाईल, असे तो म्हणाला होता. त्यानंतर आज संसदेत तीन अज्ञात व्यक्ती घुसल्याने आणि त्यांनी गॅस सारखा पदार्थ स्पे केल्याने हा संसदेवर झालेला गॅस हल्ला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.