मलायकासोबत लग्न कधी करणार? करण जोहरच्या कार्यक्रमात अर्जुन कपूरने थेटच सांगितलं
Malaika Arora Arjun Kapoor Wedding Plan: बॉलिवूडचे पॉवर कपल मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांना चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले आहे, तरीही हे कपल ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसले आहे. आता नुकतचं अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूर करण जोहरच्या प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये (Koffee with Karan 8) पोहोचले आहे. या कार्यक्रमात या दोन्ही कलाकारांनी खूप धमाल केली आहे.
करणने अर्जुन कपूरला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्नही विचारले. यावेळी अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या नात्याबद्दलही थेटच सांगितले आहे. ट्रोलिंगचा त्यांच्या नात्यावर कसा परिणाम होतो हे त्याने सांगितले आणि अर्जुनने मलायकासोबत कधी लग्न करणार याबाबत देखील खुलासा केला आहे.
View this post on Instagram
ट्रोलिंगवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया
करण जोहरने अर्जुन कपूरला प्रश्न केला होता की, तो त्याच्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी असलेल्या मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर त्याला या गोष्टीसाठी ट्रोल केले जाते. या ट्रोलिंगमुळे तुमच्या नात्यावर परिणाम होतो का? यावर उत्तर देताना अर्जुन कपूर म्हणाला की, ‘कोणतीही व्यक्ती नाही जी ट्रोलिंग पासून वाचणार आहे. तुम्हाला फक्त त्या ट्रोलिंगचा सामना करावा लागेल. तुम्हाला माहिती आहे की हे सर्व लोक तुमचे लक्ष वेधण्यासाठी हे करत असतात.
काहीजण फक्त तुम्हाला ट्रोलिंग करण्यासाठी असतात. त्यावेळेस माझ्या लक्षात आले की या लोकांना फक्त माझे लक्ष हवे आहे. मला काही फरक पडतो का? सोशल मीडियावर कधीही काहीही येते हे तुम्हाला दिसेल. हे मेम किंवा मेम पेज असू शकते. ज्यावर कोणताही मूर्खपणा लिहिलेला आहे, ज्यावर लोक कमेंट करत आहेत. लाइक्स मिळावेत म्हणून ते असे करत असतात.
Animal मध्ये सलोनीनेही घातली भूरळ; सेलिब्रेटी रॅंकिंगमध्ये मिळालं वरचं स्थान
लग्नाच्या प्रश्नावर अभिनेता काय म्हणाला?
करण जोहरने त्याला विचारले की, ‘तो मलायकासोबतचे नाते पुढे नेण्यास तयार आहे का? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्याने थेट सांगितले की, मला याचे प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे आहे, परंतु मलायकाशिवाय या शोच्या भविष्याबद्दल बोलणे अयोग्य ठरेल. अर्जुन कपूर पुढे म्हणाला की, मला वाटते की सर्वात सन्माननीय गोष्ट असेल जेव्हा आपण त्या ठिकाणी पोहोचू आणि त्याबद्दल एकत्र बोलू. मी माझ्या नात्यात आहे तिथे मी खूप आनंदी आहे. या आरामदायी ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्ही खूप संघर्ष केला आहे. याबाबत सध्या मला काहीही बोलायचे नाही. कारण एकट्याने बोलणे योग्य ठरणार नाही.