Animal मध्ये सलोनीनेही घातली भूरळ; सेलिब्रेटी रॅंकिंगमध्ये मिळालं वरचं स्थान

Animal मध्ये सलोनीनेही घातली भूरळ; सेलिब्रेटी रॅंकिंगमध्ये मिळालं वरचं स्थान

Animal : अ‍ॅनिमल (Animal) चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि बॉबी देओलने ज्या प्रमाणे आपल्या भूमिका गाजवल्या तसेच चित्रपटातील अभिनेत्रींनी देखील आपल्या आभिनयाची जादू दाखवली आहे. त्यामध्ये चित्रपटाची नायिका रश्मिका मंदाना असो कींवा तृप्ती डिमरी असो. मात्र यात आणखी एक नाव पुढ आलं आहे ते म्हणजे सलोनी बत्रा या चित्रपटातील तिचा मुख्य पात्र रीत म्हणून सलोनीचा मनमोहक अभिनय प्रेक्षकांना मोहित करून गेला.

Ahmednagar News: गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले; हेरंब कुलकर्णींचा थेट निशाणा

या अभिनयामुळे ती सेलिब्रेटी रॅंकिंगमध्ये देखील वरच्या स्थानावर पोहचली आहे. मनोरंजन चार्टवर ब्लॉकबस्टर ठरताना अभिनेत्री सलोनी बत्रा 198 व्या स्थानावरून IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत प्रभावी 26 व्या स्थानावर पोहोचली आहे. या उल्लेखनीय कामगिरी ची पोचपावती म्हणून तिची ही कमाई आहे असं म्हटलं जातंय.

Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षेत कुचराई प्रकरणी मोठी कारवाई; 7 कर्मचारी निलंबित

सलोनी बत्राचे ‘अ‍ॅनिमल’ मधील ‘रीत’ मधील भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे तिच्या IMDb च्या क्रमवारीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. ‘अ‍ॅनिमल’ साठी थिएटरमध्ये लोकांनी रांगा लावल्या आणि चित्रपट सुपरहिट ठरला. सलोनीची ‘रीत’ ची भूमिका वेगळी ठरली ज्याने सर्वत्र प्रशंसा मिळवली आणि एक आकर्षक अभिनेत्री म्हणून तिने नाव कमावलं.

Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षेत कुचराई प्रकरणी मोठी कारवाई; 7 कर्मचारी निलंबित

ही यादी ‘लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटीज’ ची असून एका साप्ताहिक IMDb वैशिष्ट्य जे जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या भारतीय स्टार्सचे प्रदर्शन करते: अभिनेते, दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, लेखक, या सूचीमध्ये हे सर्व समाविष्ट आहे! आणि, नेहमीप्रमाणे, हे जगभरातून मासिक 200 दशलक्षाहून अधिक चाहत्यांकडून निर्धारित केले जाते!”

IMDb च्या क्रमवारीत झालेली वाढ हा सलोनी बत्राच्या वाढत्या लोकप्रियतेचा केवळ पुरावा नाही तर ‘अ‍ॅनिमल’ मधील तिच्या कामगिरीचा परिणाम देखील आहे. सलोनीची उत्कृष्ट कामगिरी चित्रपटाचे यश. यामुळे सलोनीला देखील त्याचा मोठा फायदा झाला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये तिने तिचं असं स्थान निर्माण केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube