डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची भिती संपली ! भारतीय शेअर बाजारात चौथ्या दिवशी मोठी तेजी

  • Written By: Published:
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची भिती संपली ! भारतीय शेअर बाजारात चौथ्या दिवशी मोठी तेजी

Indian Stock Market: अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प (Donald Trump) यांच्या आर्थिक धोरणामुळे जगभरातील बाजार कोसळले होते. त्यात भारतीय शेअर बाजारात  मोठी घसरण झाली होती. परंतु आता भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी (Stock Market Rally) आलीय. गेल्या चार दिवसांत शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी आली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) व्याजदरात कपातीचे संकेत दिले आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी तेजीत आला आहे.

दिशा सालियन प्रकरण : चहुबाजूंनी घेरलेल्या आदित्य ठाकरेंसाठी महायुतीचे तीन नेते मैदानात?; प्रतिक्रियांमुळे भुवया उंचावल्या

आज सेन्सेक्समध्ये 899 अंकांनी वाढ झाली असून तो 76 हजार 348 अंकांवर आला आहे. तर निफ्टीही वेगाने वाढली आहे, एकादिवसात निफ्टीत 283 अंकांनी वाढ झाली आहे. त्यामुळे निफ्टी 23 हजार 190 अंकांवर येऊन थांबली आहे. आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. त्यामुळे निफ्टी आयटी इंडेक्समध्ये 2.2 टक्के वाढ झाली आहे. आयटी सेक्टरमधील विप्रो, इन्फासीस आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर्स तीन टक्कांनी वाढले आहेत.

“अनिल परब, ठाकरेंना विचारा राठोडांना का क्लीनचीट दिली?” चित्रा वाघ संतापल्या, सभागृहात काय घडलं?

बीसईच्या सर्व सेक्टरच्या इंडेक्समध्ये वाढ झाली. मेटल, मीडिया, आयटी, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, रियल्टी, टेलिकॉम इंडेक्समध्ये एक टक्का वाढ झाली. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या इंडेक्सही एक टक्के वाढ दिसून आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे खुर्चीवर बसल्यानंतर ते अनेक धक्कादायक निर्णय घेत होते. ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढण्याची निर्णयाने जगभरात शेअर बाजारात पडझड झाली होती. परंतु आता ट्रम्प हे वेगळे काही निर्णय घेणार नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी आली आहे.

फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करणार
अमेरिका फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करणार नसल्याचे संकेत फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी दिले आहे. ट्रॅरिफचा प्रभाव महागाईवर राहणार नाही. तसेच मंदीही अधिक राहणार नाही, असे पॉवेल यांनी जाहीर केले. त्यानंतर बाजारात जोरदार तेजी आली. अमेरिकेचा शेअर बाजारात मजबूत तेजी दिसून आली. डॉव जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 383 अंकांनी, तर एस आणि पी 500 इंडेक्समध्ये 1.08 टक्के वाढ झाली आहे. नॅसडॅक इंडेक्समध्ये 1.41 टक्के वाढ झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube