अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेचा दे धक्का, व्याजदरात 0.25 टक्क्यांची विक्रमी वाढ

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेचा दे धक्का, व्याजदरात 0.25 टक्क्यांची विक्रमी वाढ

The Fed Reserve once again raised rates by 0.25 percent : अमेरिका हा जगातील महासत्ता देश म्हणून ओळखला जातो. पण, जगातील इतर देशांप्रमाणे अमेरिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला (Inflation reached a peak) आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) मुख्य कर्ज दर 0.25 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि सूचित केले आहे की ते दर आणखी वाढवणार नाहीत. या निर्णयामुळे यूएस सेंट्रल बँकेचा बेंचमार्क व्याजदर एका रात्रीत 5-5.25 टक्क्यांवर गेला. मार्च 2022 पासून यूएस फेडने केलेली ही सलग दहावी दरवाढ आहे.

यूएस फेडने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर वाढवण्यास सुरुवात केली होती. गेल्या वर्षी महागाईचा दर 9.1 टक्के होता. आता हा दर 5.25 टक्के आहे. त्यामुळे अमेरिकेतील महागाईचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे.

यूएस फेडच्या दोन-दिवसीय बैठकीनंतर, “अतिरिक्त धोरण किती प्रमाणात योग्य असू शकते हे निर्धारित करण्यासाठी” असे सूचित केले आहे की, अधिकारी येत्या काही महिन्यांत अर्थव्यवस्था, चलनवाढ आणि वित्तीय बाजार कसा व्यवहार करतात हे पाहून निर्धारित करतील. तसेच, हे वाढलेले दर जूनपर्यंत स्थिर राहतील, असेही रॉयटर्सच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता सुट्ट्यांच्या दिवशी निबंधक कार्यालये सुरू राहणार

चेअर जेरोम पॉवेल यांच्या नेतृत्वाखाली फेडने नमूद केले की आर्थिक वाढ माफक राहिली, परंतु “अलीकडील घडामोडींमुळे घरे आणि व्यवसायांसाठी पत परिस्थिती घट्ट होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक क्रियाकलाप, नोकरी आणि चलनवाढ यावर दबाव आणण्याची शक्यता आहे”.

बँकिंग प्रणाली मजबूत करणे
यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, बँकिंग प्रणाली मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, आर्थिक व्यवस्थेतील गोंधळामुळे खर्च आणि वाढ दोन्ही कमी होऊ शकतात. फेड रिझर्व्हच्या या निर्णयामुळे कर्ज घेणे अधिक महाग होणार आहे.

2007 नंतरची सर्वोच्च पातळी
फेड रिझर्व्ह बँक मागील गेल्या 14 महिन्यांपासून सातत्याने दर वाढवत आहे. या वाढीमुळे वाहन कर्जापासून ते क्रेडिट कार्ड कर्ज आणि व्यवसाय कर्जापर्यंतचे व्याजदर दुप्पट झाले आहेत. फेडरल रिझर्व्हच्या या वाढीपूर्वी व्याजदर 5 टक्के होता, तो आता 5.25 टक्के आहे. 2007 नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube