घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता सुट्ट्यांच्या दिवशी निबंधक कार्यालये सुरू राहणार

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता सुट्ट्यांच्या दिवशी निबंधक कार्यालये सुरू राहणार

Registrars Office: दस्त नोंदणीसाठी नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. नागरिकांना शनिवारी व रविवारी वेळही मिळतो. परंतु दुय्यम निंबधक कार्यालयांना सुट्टी असते. त्यावर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तोडगा काढला आहे. यापुढे जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालय शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याचे विखे यांनी जाहीर केले आहे.

Karnataka Election: गंभीर गुन्हे असलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेस अव्वल, भाजप कितव्या क्रमांकावर ?

मुंबई शहर, उपनगर, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, अलिबाग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, लातूर, नांदेड, नाशिक, जळगाव, संभाजीनगर येथील जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

Maharashtra BJP : नव्या कार्यकारिणीत आमदार-खासदारांना डच्चू, पाहा, काय आहे गणित

या वर्षी राज्यातील रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सन 2022-2023 च्या दरात कोणताही बदल न करता तो 2023-2024 या वर्षासाठी लागू करण्यात आला आहे.

राज्यात मुंबईत सर्वाधिक दस्त नोंदणी होते. त्यामुळे सरकारला उत्पन्न जास्त मिळते. मुंबई शहरात गेल्या मार्च महिन्यात 12,421 मालमत्ता विक्री नोंदणी झाली. त्यामुळे 1,143 कोटी रुपये दस्तनोंदणी पोटी मिळाले आहेत. यात नोंदणीकृत मालमत्तांपैकी 84 टक्के निवासी, तर 16 टक्के अनिवासी मालमत्ता होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube