70 हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही; मागची पानं चाळली तर… बावनकुळेंचा अजितदादांना थेट इशारा

Chandrashekhar Bawankule : बोलता खूप येईल, पण ही बोलण्याची वेळ नाही. हे खूप काही अभिमानास्पद नाही. शेवटी कोर्टामध्ये केस चालू आहे.

  • Written By: Published:
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar

Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar: पुणे व पिंपरी चिंचवड (PCMC ELection) महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढत आहे. या दोन्ही महानगरपालिकेत भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होत आहे. त्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट भाजपच्या स्थानिक नेत्यांना लक्ष्य केलंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय. यावरून भाजपचे नेतेही अजितदादांवर जोरदार चिडलेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी थेट पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांवर भाष्य केलंय. तर महसूल चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याची अजित पवार यांना आठवण आणून दिली आहे. ( thousand crores not yet resolvedChandrashekhar Bawankule On Ajit Pawar)

Video : आमदार योगेश टिळेकरांमुळे माझी उमेदवारी कापली; संदीप लोणकर यांचा थेट आरोप

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 70 हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अद्याप लागलेला नाही. बोलता खूप येईल, पण ही बोलण्याची वेळ नाही. हे खूप काही अभिमानास्पद नाही. शेवटी कोर्टामध्ये केस चालू आहे. त्यावर निकाल येईल, त्यावरच आपण पुढे जाऊ. शेवटी केस कोर्टाच्या विचारधीन आहे. अजून निकाल लागलेला नाही. अजितदादा प्रगल्भ नेता आहे, अशा गोष्टी त्यांनी तरी बोलू नयेत.

मोठी बातमी; सोनिया गांधींची प्रकृती खालावली; सर गंगाराम रुग्णालयात दाखल


मागचे पाने पलटली तर त्यांना बोलता येणार नाही.

छोट्या निवडणुकीत थेट टीका करणे योग्य नाही. एका महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीत मतभेद, मनभेद निर्माण करणे योग्य नाही. अजितदादा याचा विचार करतील, बोलता येण्यासारखी खूप आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्षे अजित पवार यांची सत्ता होती. मग मागचे पाने पलटली तर त्यांनाही बोलता येणार नाही. आमची इच्छा नाही, मागील पाने पलटायचे. सन्मानीय समितीत ठरल्याप्रमाणे अजितदादा पुन्हा असे बोलणार नाहीत, असा आशावाद बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

follow us