Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? अजितदादा म्हणाले, ‘तुझ्या तोंडात साखर पडो…’
Ajit Pawar : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आजपासून जोरदार प्रचाराची सुरुवात होणार आहे.
Ajit Pawar : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आजपासून जोरदार प्रचाराची सुरुवात होणार आहे. महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? याबाबत राज्यातील राजकारणात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
तर दुसरीकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येणार का? यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महापालिका निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सत्ताधारी आणि महायुतीमधील घटक पक्ष भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र यावेळी शरद पवारांचे फोटो तुमच्या फ्लेक्सवर आहेत, हे आत्तापुरतं आहे की, कायमस्वरूपी राहणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देत अजित पवार म्हणाले की, तुझ्या तोंडात साखर पडो असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या या उत्तरामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.
गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी; 11 जणांवर गुन्हा दाखल
पुणेसह पिंपरी -चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवत असून मुख्य लढत भाजपसोबत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्याविरोधात निवडणूक लढवत असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
बिनविरोध निवडणुकांची चौकशी करा; राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
