नागपूर खंडपीठाचा जिल्हा परिषद निवडणुकांना हिरवा कंदील? सर्कलच्या नवीन रोटेशनला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या

Zilla Parishad election साठी नवीन सर्कल रोटेशन आखण्यात आलं आहे. यावर आक्षेप घेणाऱ्या तब्बल चार याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळल्या आहेत.

Zilla Parishad election 2025

Zilla Parishad election 2025 Nagpur bench dismissed Pettion against New rotation : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी प्रभाग रचना जाहीर झाल्या आहेत. तर जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नवीन सर्कल रोटेशन आखण्यात आलं आहे. मात्र यावर याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या आक्षेप घेणाऱ्या तब्बल चार याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुका होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.

अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! नवरात्रीमध्ये ‘या’ पर्यायी मार्गाने करावी लागणार वाहतूक

या याचिकांमध्ये नागपूर, अमरावती आणि बुलढाण्यातील राजकीय कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषद साठी परिषदांच्या सर्कल नवीन रोटेशननुसार आखण्यावर आक्षेप घेतला होता. मात्र खंडपीठाने यावर निकाल देताना याचिका गुणवत्ताहीन असल्याचं सांगितलं. तसेच नवीन रोटेशन बद्दलचा राज्य सरकारचा निर्णय अवैध नाही. असं म्हणत याचिका फेटाळून लावले आहेत.

पाकिस्तानात घरच्या सारखं वाटत…बिहार निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान, भाजपनं घेरलं

दरम्यान खंडपीठाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या नवीन रोटेशननुसार होणारी ही पहिली निवडणूक असणार आहे. त्याचबरोबर राज्यघटनेतील कलम 243-ओ नुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर न्यायालयाला निवडणुकीत हस्तक्षेप करता येत नाही. या पार्श्वभूमीवर देखील याचिका फेटवून लावण्यात आले आहेत.

follow us