पाकिस्तानात घरच्या सारखं वाटत…बिहार निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान, भाजपनं घेरलं

Congress Leader Sam Pitroda यांनी पाकिस्तानवर स्तुतिसुमन उधळत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यामुळे भाजपच्या हातात आयत कोलीत मिळणार आहे.

Sam Pitroda

Congress Leader Sam Pitroda Contervercial Statement About Pakistan i felt like home : सध्या देशामध्ये आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस वारंवार आमने-सामने येत आहेत. त्याच दरम्यान राहुल गांधींकडून भाजपवर मत चोरीचा आरोप केला जातो. याच दरम्यान आता काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यामुळे भाजपच्या हातात आयत कोलीत मिळणार आहे.

नेमकं काय म्हणाले सॅम पित्रोडा?

राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जाणारे सॅम पित्रोदा हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी पक्षाला आणि राहुल गांधींना अडचणीत आणत असतात. यावेळी त्यांनी थेट पाकिस्तानवर स्तुतिसुमन उधळले आहेत. ते म्हणाले की, मला वाटतं आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आपण सगळ्यात अगोदर आपल्या शेजारील राष्ट्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांच्याशी आपण संबंध सुधारू शकतो का? हे पाहिलं पाहिजे. मी पाकिस्तानात जाऊन आलो आहे. मला येथे घरी असल्यासारखं वाटलं आहे. त्याचबरोबर मी बांगलादेश, नेपाळ येथेही गेलो आहे. त्या ठिकाणी देखील मला तसंच वाटलं. या ठिकाणी येऊन मला आपण एखाद्या बाहेरील देशांमध्ये आलो आहे. असं जाणवलं नाही.

भारतीयांचं अमेरिकेत उच्चशिक्षण अन् नोकरीचं स्वप्न भंगलं! H-1B व्हिसासाठी मोजावे लागणार 83 लाख

दरम्यान पित्रोडा यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला काँग्रेसला घेण्यासाठी संधी चालून आली. यावर भाजपने तिखट प्रतिक्रिया दिली. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारे हे म्हणाले की, राहुल गांधी यांचे चाहते आणि काँग्रेसचे विदेश प्रमुख पित्रोदा म्हणत आहेत की, पाकिस्तानमध्ये त्यांना घरी असल्यासारखं वाटलं. यामध्ये आश्चर्य काहीच नाही. कारण युपीएने 26/11 च्या आल्यानंतर देखील पाकिस्तानवर कोणतेही कारवाई केली नाही. त्यामुळे हा पाकिस्तानचा चाहता काँग्रेसनेच निवडला आहे.

कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या, मेष ते मीन बाराही राशीभविष्य…

दरम्यान दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर आले आहेत. महाराष्ट्रमध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेतल्या जातील. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून केलं गेलेलं. हे वक्तव्य भाजपच्या पथ्यावर पडू शकतो. या निवडणुकीमध्ये याच मुद्द्यावरती काँग्रेसला घेरलं जाऊ शकतं आणि निवडणुकीचं हत्यार बनवले जाऊ शकतात.

follow us