ज्यावर गर्व करावा त्यावर वाद नको! माधुरी हत्तीण प्रकरणी वनताराविरोधात याचिका, सुप्रीम कोर्टाने फटकरलं…
Kolhapur Madhuri Elephant वनतारामध्ये नेण्यात आली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले.

Kolhapur Madhuri Elephant transfer in Vantara Supreme Court dismissed petitions : कोल्हापूरमधील नांदणी मठातील माधुरी हत्तीण (Kolhapur Madhuri Elephant ) गुजरातमधील अनंत अंबानी यांच्या वनतारा या अभयारण्यामध्ये नेण्यात आली होती. त्यावरून मोठा वाद झाला होता. त्यानंतर या प्रकरणी पेटा आणि वनताराविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच यासाठी एक चौकसीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. त्याचा अहनवाल आल्यानंतर आता न्यायालयाने त्यावर सुनावणी दिली आहे. त्यामध्ये माधुरी हत्तीण प्रकरणी वनताराविरोधात याचिका करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले आहे.
भारत-अमेरिका व्यापार संबंध सुधारणार? टॅरिफ युद्धानंतर ट्रम्प यांचा खास अधिकारी भारतात
काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?
माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचा अहवाल आला आहे. यामध्ये वनतारावर (Kolhapur Madhuri Elephant ) करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावर सुनावणी देताना कोर्टाने म्हटलं की, काही चांगल्या गोष्टीही होऊ द्या. त्यावर आनंद व्यक्त करा. देशात अनेक गोष्टी आहेत. ज्याच्यावर आपण गर्व करू शकतो. त्यावर व्यर्थ वाद घातले जाऊ नये. तसेच एसआयटीने यावर जलद अहवाल दिला . त्यावर न्यायालायने त्यांचं कौतुक केलं आहे.
वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन; सुप्रीम कोर्टातच आली चक्कर अन् उपचारादरम्यान मृत्यू
याचिकेमध्ये काय आरोप केले?
सी आर जया सुकशन आणि देव शर्मा या दोन याचिकाकर्त्यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या या प्राण्यांना अभय देणाऱ्या अभयारण्यवर (Kolhapur Madhuri Elephant ) अनियमिततेचे आरोप केले. तसेच वनतारामध्ये प्राणी जमा करण्यासाठी सरकारचा वापर केला जात आहे. त्यामुळे न्यायालायने वनतरामधील हत्तींना त्यांच्या मूळ मालकांकडे सोपवण्याचे आदेश द्यावेत.