वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन; सुप्रीम कोर्टातच आली चक्कर अन् उपचारादरम्यान मृत्यू
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी निधन झालं. हृदय क्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 48 वर्षांचे होते.

Supreme Court Advocte Sidharth Shinde Passed Away : सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी निधन झालं. हृदय क्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 48 वर्षांचे होते. शिंदे हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. कायद्याची सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेमध्ये मांडणी करणारे जाणकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने न्यायालयीन क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात असतानाच शिंदेंना आली चक्कर…
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात असतानाच वकील सिद्धार्थ शिंदे यांना चक्कर आली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र यावेळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव आज मंगळवारी 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दिल्लीहून पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मेष ते मीन या बारा राशींचं 16 सप्टेंबरचं राशीभविष्य कसं असणार? जाणून घ्या…
दरम्यान सिद्धार्थ शिंदे म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला होता. संविधानाविषयी तसेच न्यायालयीन निर्णयांविषयी ते सर्वसामान्य लोकांना समजेल. अशा सोप्या आणि सहज भाषेत मांडणी करून सांगत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. ते मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील राहिवासी होते. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षांपासून शिंदे कुटुंबीय पुण्यामध्ये स्थायिक झाले होते.