भारत-अमेरिका व्यापार संबंध सुधारणार? टॅरिफ युद्धानंतर ट्रम्प यांचा खास अधिकारी भारतात
Donald Trump यांनी लावलेल्या टॅरिफमुळे भारत अमेरिकेतील व्यापारी संबंध बिघडले. यावर चर्चेसाठी ट्रम्प यांनी खास अधिकारी भारतात पाठवला आहे.

Donald Trump sent special Officer for India America Trade relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारत अमेरिकेतील व्यापारी संबंध बिघडले आहेत. मात्र यावर चर्चा करण्यासाठी ट्रम्प यांनी त्यांचा खास अधिकारी भारतात पाठवला आहे. त्यामुळे आता भारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंध सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन; सुप्रीम कोर्टातच आली चक्कर अन् उपचारादरम्यान मृत्यू
मंगळवारी नवी दिल्लीत दोन्ही देश उच्चस्तरीय बैठकीतील ज्यामध्ये भारत अमेरिकेतील व्यापारी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले जातील. यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे खास अधिकारी ब्रॅंडल लिंच यांना भारतात पाठवला आहे. त्यांच्याशी भारताचे मुख्य वाणिज्य मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, मंगळवारी चर्चेनंतर अमेरिकन टीम भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधेल. यामध्ये व्यापारावर चर्चा केली जाईल. त्यानंतर भारताने अमेरिकेतील व्यापारी संबंध सुधारून सकारात्मक करार होण्याची शक्यता आहे.
मेष ते मीन या बारा राशींचं 16 सप्टेंबरचं राशीभविष्य कसं असणार? जाणून घ्या…
दरम्यान नुकतच टॅरिफच्या (US Tariff) मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध बिघडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प भारताला सातत्याने टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावत आहेत. या दरम्यान मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती झाल्याचं समोर आलं आहे. कारण नुकतच ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर मोदी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले मी देखील ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे.