अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! नवरात्रीमध्ये ‘या’ पर्यायी मार्गाने करावी लागणार वाहतूक

Ahilyanagar Transportation नवरात्रोत्सावाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्याची सुधारित अधिसूचना जारी केली आहे.

Ahilyanagar Transportation

Ahilyanagar Transportation will change for Navratri 2025 alternative route : अहिल्यानगर शहरामध्ये आगामी नवरात्रोत्सावाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्याची सुधारित अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे अहिल्यानगरहून जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनधारकांना ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. कोणते आहेत हे पर्यायी मार्ग जाणून घ्या…

पाकिस्तानात घरच्या सारखं वाटत…बिहार निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान, भाजपनं घेरलं

मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पुणे-छत्रपती संभाजीनगर, मनमाड-दौंड, कल्याण-पाथर्डी हायवेवरून येणाऱ्या वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्याची सुधारित अधिसूचना जारी केली आहे.

भारतीयांचं अमेरिकेत उच्चशिक्षण अन् नोकरीचं स्वप्न भंगलं! H-1B व्हिसासाठी मोजावे लागणार 83 लाख

छत्रपती संभाजीनगर-मनमाड या शहराकडून येऊन पुणे व कल्याणकडे जाणारी जड वाहतूक शेंडी-निंबळक-केडगाव मार्गे पुणे व कल्याण शहराकडे वळविण्यात आली आहे. तर पुण्याकडून येऊन मनमाड व छत्रपती संभाजीनगर शहराकडे जाणारी जड वाहतूक केडगाव-निंबळक-शेंडी मार्गे मनमाड व छत्रपती संभाजीनगर शहराकडे वळविण्यात आली आहे.

कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या, मेष ते मीन बाराही राशीभविष्य…

अहिल्यानगर शहरातील बाजारपेठेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या मालवाहतुकीस (हलकी व अवजड) सकाळी 3 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत बंदी राहील. यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्याची वाहतूक करणारी व निवडणूक कर्तव्यावरील वाहने वगळण्यात आली आहेत. मात्र, रात्री 10 वाजेपासून सकाळी 3 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या हलक्या व अवजड वाहनांना प्रवेश दिला जाईल.

Breaking! मणिपूरमध्ये आसाम रायफल्सवर दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद, अनेक जखमी

तसेच, रात्री 10 वाजेपासून सकाळी 3 वाजेपर्यंतचा कालावधी वगळता इतर वेळेत अहिल्यानगर शहर हद्दीतील कोणत्याही सार्वजनिक जागांवर किंवा रस्त्याच्या आजूबाजूस हलकी व अवजड मालवाहू वाहने उभी करण्यास किंवा पार्किंग करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

 

follow us