Pune Car Accident : सुरेंद्र अग्रवालांसाठी जोरदार युक्तिवाद, तरीही कोर्टाने दिली पोलीस कोठडी
पुणे : कल्याणी नगर अपघात प्रकरणात वाहन चालकांना धमकावल्याबद्दल आणि त्याला डांबून ठेवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agrwal) यांना अटक केली. त्यांना आज (दि. 25) कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सुरेंद्र अग्रवाल यांची रवानगी 28 मे पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. (Kalyani Nagar Car Accident Minor Accused Grandfather Surendra Agrawal Sent To Police Custody)
#WATCH | Maharashtra: Pune car accident accused's grandfather arrested and taken to court. pic.twitter.com/XUQ0BzbvrN
— ANI (@ANI) May 25, 2024
अपघातानंतर कार चालकाला धमकी देऊन जबाब देण्याबाबत दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याआधी गुरुवारी सुरेंद्र अग्रवालची चौकशी झाली होती. या चौकशीत अल्पवयीन मुलाला चावी दिल्याची कबुली त्यांनी दिली होती. नातू अल्पवयीन असल्याने त्याच्यावर अल्पवयीन म्हणूनच खटला चालवावा अशी मागणीही त्यांनी केली होती.
Pune Accident मधील आरोपींचा जामीनाचा मार्ग मोकळा; असीम सरोदेंनी सांगितलं कारण
कोर्टात काय झाला युक्तीवाद?
कल्याणी नगर अपघात प्रकरणात चालकाला धमकावणे आणि डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपची आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी अग्रवाल यांच्या बाजूने वकिलांना जोरदार युक्तीवाद केला. तसेच पुण्यात अपघात झाला त्यावेळी मी दिल्लीत होतो असे सुरेंद्र अग्रवाल यांना सांगितले, तसेच मी दिल्लीत असतानाच पोलीस घरातला डीव्हिआर घेऊन गेले. मात्र, घरातल्या सीसीटीव्हीसोबत छेडछाड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Pune Accident वर रॅप व्हिडीओ करणारा समोर; अल्पवयीन मुलाच्या आईनेही दिलं होतं स्पष्टीकरण
आरोपीचे वकील काय म्हणाले?
कोर्टाीतील युक्तीवादावेळी आरोपीच्या वकिलांना सांगितले की, अपघातानंतर कारचालक स्वतःहून आरोपीच्या घरी गेला होता. तसेच माझ्या जिवाला धोका, मी इथेच थांबून एक दिवसानंतक घरी जातो असेही कारचालक म्हणाला होता असे वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले. सुरेंद्र अग्रवाल यांनी कारचालकाला डांबून ठेवले न्हते असेही वकीलम म्हणाले.
अग्रवाल यांचे वय 70 वर्षाहून अधिक असून, त्यांना वेगवेगळे आजार आहेह. ज्यावर उपचार सुरू आहेत. सुरेंद्र अग्रवाल कुठेही जाणार नाहीत तसेच ते तपासात कुठेही जाणार नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. मात्र हा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने त्यांना दिलासा देण्याऐवजी सुरेंद्र अग्रवाल यांना चौकशीसाठी 28 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
धंगेकरांचं खळबळजनक ट्विट! पबमधील फोटो शेअर करत म्हणाले, “४८ तासांच्या आत…”
दोन पोलिसांचे निलंबन
अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी आजोबा सुरेंद्र अगरवालच्याही मुसक्या आवळल्या आहेत. कार ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शु्क्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
कल्याणीनगर येथील अपघाताचे प्रकरण देशभरात गाजत आहे. या प्रकरणात रोजच धक्कादायक खुलासे होत आहेत. काल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले. या प्रकरणात सुरुवातीला येरवडा पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचेही मान्य केले. त्यानंतर लगेचच दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.