Pune Porsche Accident : आता तपास अधिकारी बदलला ! स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास

  • Written By: Published:
Pune Porsche Accident : आता तपास अधिकारी बदलला ! स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास

Pune Porsche Accident: Now the investigating officer has changed! Investigation with local crime branch : पुण्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar) भागात बिल्डर पुत्राने अति वेगाने पोर्शे कार (Porsche car Accident) चालवून दोघांचा बळी घेतला होता. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. बिल्डर पुत्राला वाचविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप होत होता. तसेच पोलिसांविरोधात संतापही व्यक्त होत होती. आता मात्र पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी दोन मोठे निर्णय घेतले आहे.

Pune Accident मधील आरोपींचा जामीनाचा मार्ग मोकळा; असीम सरोदेंनी सांगितलं कारण


येरवडा पोलीस
ठाण्यातील (Yerwada Police) दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे (Rahul Jagdale) आणि विश्वनाथ तोडकरी (Vishwanath Todkari) अशी दोघांची नावे आहेत. हिट अॅण्ड रन गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर आता तपासी अधिकारीही बदलण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे या करीत होत्या. पोलिस आयुक्तांनी त्यांच्याकडून तपास काढून घेतला असून, तो आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. आता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे हे करीत आहेत.

पोर्शे कार अपघातावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी…

विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी (दि.22) रोजी पुणे सत्र न्यायालयाने विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी अग्रवालला न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी केलेली सात दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगत विशाल अग्रवालची रवाननगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली आहे. मात्र, पोलिसांना इतके दिवस तपासासाठी का लागतात? असा युक्तिवाद अग्रवालच्या वकिलांनी केल्यानंतर न्यायालयाने अग्रवालला पुढील तपासासाठी 14 दिवस पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने दोन पब मालक आणि इतर तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज