OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर कोर्टात खेचू’; ओबीसी नेत्यांचा सरकारला स्पष्ट इशारा

OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर कोर्टात खेचू’; ओबीसी नेत्यांचा सरकारला स्पष्ट इशारा

OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी सभागृहात मांडले. मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे असे सांगितले जात आहे. मात्र, या आरक्षणाला मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) विरोध केला असून या आरक्षणाची आमची मागणीच नव्हती. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी आणि ओबीसीतून 50 टक्क्यांच्यात आत आरक्षण या मागणीवर ठाम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यानंतर ओबीसी नेत्यांकडूनही प्रतिक्रिया आल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आतापर्यंतचं हे तिसरं अधिवेशन आहे. समाजाला टिकणारं आरक्षण देणार अशी आमची माहिती आहे. कायद्यात टिकणारं आरक्षण देणार असं सांगितलं जात असताना ओबीसींच्या आरक्षणालाही (OBC Reservation) धक्का लागणार नाही असंही सांगितलं जात आहे. आता जे बिल आहे त्याचा मसुदा कोणताही आमदार वा मंत्र्याकडे नाही. आम्ही हा मसुदा मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु मिळाला नाही.

Manoj Jarange : ‘आजच्या अधिवेशनात काही झालं नाही तर आम्ही’.. जरांगे पाटलांंचा स्पष्ट इशारा

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास आमचा कोणताच विरोध नाही. मात्र हे करत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची मागणी आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा कायदा सरकारने पास करावा. असं जर झालं नाही तर आम्ही या आरक्षणाला कोर्टात आव्हान देऊ असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला.

मागासवर्ग आयोग म्हणजे टोटल फिक्सिंग आहे. अनेकांना या आयोगातून काढून टाकलं. मला अहवाल वाचू द्या मग मी सही करतो म्हणून मेश्राम या सदस्यांना काढून टाकण्यात आले. फक्त दहा ते बारा दिवसात कोट्यावधी मराठ्यांचं सर्वेक्षण करणे ही मोठी गोष्ट आहे. ही माहिती खरी आहे की बोगस हे देखील लवकरच कळेल, असा सूचक इशारा शेंडगे यांनी दिला.

Chhagan Bhujbal : प्रकाश शेंडगेंच्या नव्या पक्षाच्या घोषणेवर भुजबळांचा सल्ला; हा विचार ओबीसींच्या एकीमध्ये खंड 

..तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल – तायवाडे 

सरकार मराठा समाजाला आज जे दहा टक्क आरक्षण देण्याची तरतूद करत आहे त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करत आहोत. मात्र ओबीसी समाजाच्या 27 टक्के आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागता कामा नये. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्रे देऊ नयेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणारी भूमिका जर सरकारने या अधिवेशनात घेतली तर ओबीसी पेटून उठेल, ओबीसी रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज