Chhagan Bhujbal : हेमंत गोडसेंचा लोकसभेचा मार्ग मोकळा, छगन भुजबळांची माघार !

Chhagan Bhujbal : हेमंत गोडसेंचा लोकसभेचा मार्ग मोकळा, छगन भुजबळांची माघार !

Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून (Nashik Lok Sabha Constituency) माघार घेतल्याची घोषणा केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली.  त्यामुळे आता ही जागा शिंदे गटाला राहणार आहे. या जागेवरून आता विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी नाशिक मतदारसंघावर दावा केला होता. त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरून तिढा निर्माण झाला होता. मात्र आता मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून माघार घेतल्याची घोषणा केली आहे.

या जागेवरून महायुतीमध्ये (Mahayuti) तणाव निर्माण होऊ नये, तसेच प्रचारात विरोधकांना आघाडी मिळू नये, यामुळे मी हा निर्णय घेत असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

काय म्हणाले छगन भुजबळ?

या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ म्हणाले, होळीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मला देवगिरी बंगल्यावर बोलावून घेतलं होतं. त्यावेळी देवगिरी बंगल्यावर खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. अजित पवार यांनी मला दिल्लीमध्ये जागावाटपाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर बैठक झाली असून नाशिक मतदारसंघ आपल्याला मिळाला आहे. तुम्ही उमेदवारीची तयारी करा असे आदेश अजित पवार यांनी मला दिले. मात्र नाशिकसाठी समीर भुजबळ हे योग्य उमेदवार आहेत, असेही मी अजित पवारांना सांगितल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

अमित शाह यांनी नाशिकसाठी छगन भुजबळ योग्य उमेदवार असून त्यांनी निवडणूक लढावे, असा सल्ला दिल्याचा निरोप अजित पवारांनी मला दिला. तसेच या मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार असून हा मतदारसंघ त्यांच्या वाट्यातला आहे, अशीही आठवण छगन भुजबळ यांनी अजित पवारांना करून दिली. मात्र आम्ही शिवसेनेची समजूत घालू, असा शब्द अमित शाह यांनी आम्हाला दिला असल्याचे अजित पवार मला म्हणाले, असेही छगन भुजबळ यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, यानंतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी देखील तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल, असे सांगितले.

WhatsApp देणार यूजर्सला सुखद धक्का! पाहता येणार ऑनलाइन यूजर्सची लिस्ट

मात्र होळी होऊन तीन आठवडे झाले तरीही महायुतीकडून उमेदवार स्पष्ट होत नसल्याने आणि विरोधकांना प्रचारात विरोधकांना आघाडी मिळू नये, म्हणून मी आज उमेदवारीतून माघार घेत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज