WhatsApp देणार यूजर्सला सुखद धक्का! पाहता येणार ऑनलाइन यूजर्सची लिस्ट
WhatsApp Recently Online Feature : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) लवकरच एक नवीन फिचर (Feature ) आणणार आहे. या नवीन फिचरच्या मदतीने एकदा यूजर्स आता एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर क्लिक करून तो ऑनलाइन कधी होता याची माहिती मिळवू शकणार आहे.
व्हॉट्सॲप एका नवीन फिचरवर काम करत आहे. या नवीन फिचरचे नाव ‘Recently Online’ असल्याची माहिती समोर आली आहे. या नवीन फिचरच्या मदतीने कंपनी युजर्सला ज्या काँटॅक्टशी बऱ्याच दिवसापासून बोलणे झालेले नाही त्याबद्दलही माहिती देणार आहे.
wabetainfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपचा नवीन अपडेट Google Play Store वर उपलब्ध करू देण्यात येत आहे. सध्या नवीन फिचर Android व्हर्जन 2.24.9.14 WhatsApp वर दिसून येत आहे. या नवीन फिचरमध्ये तुम्हाला तुमच्या काँटॅक्टमध्ये असणारे यूजर्स कधी ऑनलाईन आले होते याची माहिती मिळणार आहे. यामुळे आता तुम्हाला एकदा यूजर कधी ऑनलाईन आला होता हे तापण्यासाठी तुम्हाला कोणताही यूजरच्या चॅट विंडोवर स्वतंत्रपणे जाण्याची गरज नाही.
नवीन अपडेटनंतर तुमच्या काँटॅक्ट लिस्टमध्ये Recently Online हा ऑप्शन दिसून येणार आहे. Recently Online मध्ये कोणते यूजर ऑनलाईन आहे याची एक लिस्ट तुम्हाला दिसणार आहे. यामुळे आता युजर्सना संवाद साधणे सोपे होणार आहे.
माढा लोकसभेची निवडणूक सोपीच; चंद्रकांत पाटलांनी मांडले संपूर्ण गणित
wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, टेस्टिंग फेजनंतर हे फिचर सर्व यूजर्ससाठी जारी करण्यात येणार आहे. माहितीनुसार या आठवड्यात WABetaInfo द्वारे या नवीन फिचरची तपशील जारी करण्यात येणार आहे. याचबरोबर यूजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी आणखी काही नवीन फीचर्सवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.