WhatsApp कॉल करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता कॉलिंगसाठी होणार मोठा बदल

WhatsApp कॉल करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता कॉलिंगसाठी होणार मोठा बदल

WhatsApp New Feature : यूजर्सची सुरक्षा लक्षात घेत व्हॉट्सॲप (WhatsApp) नेहमी नवीन नवीन फिचर लाँच (New Feature) करत असते. असाच एक नवीन फिचर व्हॉट्सॲप लवकरच लाँच करणार आहे ज्याचा यूजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

माहितीनुसार, व्हॉट्सॲप या नवीन फिचरवर एप्रिल महिन्यापासून काम करत होता आणि आता हे फिचर रोल आउट होणार आहे. या नवीन फिचरमध्ये तुम्ही कॉल टॅबमध्ये फेव्हरेट्स आणि चॅट फिल्टर्स देखील जोडू शकतात. तसेच तुमच्या सोयीनुसार व्हॉट्सॲपमध्ये बदल करू शकता. हे अपडेट iOS 24.11.85 साठी WhatsApp मध्ये दिले जात होते.

या फीचरच्या मदतीने यूजर्स चॅट लिस्टमध्ये दिलेल्या डेडिकेटेड फेव्हरेट चॅट्समध्ये महत्त्वाचे आणि आवडते कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप ॲड करू शकतात. तसेच व्हॉट्सॲपच्या या नवीन फिचरमध्ये तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटस पाहून त्यांना लाईकही करू शकातात. तर दुसरीकडे व्हॉट्सॲप calling UI मध्ये देखील तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करू शकतात. यापूर्वी देखील व्हॉट्सॲपने Calling UI मध्ये बदल केला होता जे जे यूजर्सना खूप आवडले होते.

WABetaInfo ने आपल्या पोस्टमध्ये WhatsApp च्या या नवीन फीचरची माहिती दिली आहे. WABetaInfo ने नवीन चेंजलॉगचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, वापरकर्ते आता कॉल्स टॅबमध्ये आवडते आणि चॅट फिल्टर जोडू शकतात. यासाठी वापरकर्त्यांना ॲप सेटिंग्ज ओपन करून फेव्हरेट्स विभागात जावे लागेल. येथून तुम्ही तुमच्या फेव्हरेट्सच्या लिस्टमध्ये कॉन्टॅक्ट आणि ग्रुप जोडू शकता. या विभागात तुम्ही फेवरेट्सची रीअरेंज, ऍड किंवा रिमूव्ह करू शकतात.

Video : मोठी बातमी! MIM च्या पत्रकार परिषदेमध्ये राडा; पहा व्हिडिओ

व्हॉट्सॲपने ॲप स्टोअरवर शेअर केलेल्या चेंजलॉगनुसार, यूजर्स आता नवीन कॉलिंग UI देखील अनुभवायला मिळेल. यामध्ये कंपनी अपडेटेड कंट्रोल आणि ईजी ऍक्सेस देणार आहे. तसेच तुम्ही एखादी कॉल देखील सहज मॅनेज करू शकतात. अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube