रील बनवणाऱ्यांसाठी Instagram चं खास फिचर; एकाच रीलमध्ये वापरा असंख्य गाणी
Instagram New Feature 20 songs can use in a reel : इंन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील हे सर्वच युजर्स अत्यंत आवडतं असं फिचर आहे. या माध्यमातून जेवढे लोक रील किंवा व्हिडिओ बघतात. तेवढेच लोक ते व्हिडिओ बनवतात देखील. त्यामुळे याच रील बनवणाऱ्यांसाठी आता इंस्टाग्रामने एक खास फीचर (New Feature) आणलं आहे. त्यानुसार आता रील बनवताना रील बनवणाऱ्यांना तब्बल वीस गाणे (songs) वापरता येणार आहेत.
“जरांगेंचं सगळं नाटक खुर्चीसाठीच आता त्यांचा…” अजय महाराज बारस्करांचा घणाघात
भारतातील युजरसाठी आजपासूनच इंन्स्टाग्रामने हे नवं फिचर आणलं आहे. यामध्ये एका रीलमध्ये तब्बल वीस ऑडिओ ट्रॅक जोडता येणार आहेत. विशेष म्हणजे इन्फ्लुएंसर्स, क्रिएटर यांनी बनवलेले हे ऑडिओ ट्रॅक इतर युजर्स सेव्ह करून ते पुन्हा वापरू शकणार आहेत. त्याचबरोबर या रील व्हिडिओजमध्ये मजकूर, स्टिकर्स, व्हिडिओ क्लिप एडिट करता येणार आहे. जेणेकरून अधिकाधिक युजर्सला आकर्षित करता येणार आहे.
Yash: ‘रॉकी भाई’ डॅशिंग लूक ठरतोय वेगळा, ‘टॉक्सिक’ चित्रपटातील लेटेस्ट स्टाईल होतेय व्हायरल
इंस्टाग्रामचे हेड ॲड मोसरी यांनी ही बातमी शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, आजपासून आम्ही रीलमध्ये तब्बल वीस ऑडिओ ट्रॅक जोडण्याचा खास फीचर आणत आहोत. त्यामुळे हे फीचर एकदा वापरून पाहा आणि तुम्हाला काय वाटतं? हे मला नक्की कळवा असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.