“जरांगेंचं सगळं नाटक खुर्चीसाठीच आता त्यांचा शेवट सुरू झालाय” अजय बारस्करांचा घणाघात
Ajay Baraskar serious Allegations on Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज आपले उपोषण मागे घेतले. सलाईन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नाही असे स्पष्ट करत त्यांनी उपोषण स्थगित केलं. उपोषण स्थगित करताना त्यांनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला. यानंतर जरांगे यांचे विरोधक अजय महाराज बारस्कर यांनी (Ajay Maharaj Baraskar) पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगेंकडून फक्त भ्रम पसरवण्याचं काम केलं जात आहे. ज्याला सुरुवात असते त्याला शेवटही असतो. आता जरांगे यांचा शेवट सुरू झाला आहे, असा दावा अजय महाराज बारस्कर यांनी केला.
अजय बारस्कर म्हणाले, मनोज जरांगे यांचं आंदोलन कशासाठी होतं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) होतं, कुणा राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी होतं की स्वतः ला मुख्यमंत्रिपदाची खु्र्ची मिळावी यासाठी होतं याचा उलगडा आज त्यांच्याच तोंडून झाला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यांनीच पुरावे दिले. त्यांच्या उपोषणातलं एक वाक्य होतं की उपोषण बेगडी आहे. माझी आता लोकांना एकच विनंती आहे. जरांगे स्वतःच म्हणाले उपोषण बेगडी आहे. मग माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कोणत्या लोकांनी उपोषणाला बसण्याचा आग्रह केला होता? त्या लोकांची नावं जाहीर करा असे आव्हान बारस्कर यांनी दिलं.
अजय महाराज बारस्करांची प्रहारमधून हकालपट्टी, जरांगेंवर टीका केल्यानं बच्चू कडूंचा मोठा निर्णय
मला वाटतं उपोषणासाठी बारामतीचेच लोकं म्हटले असण्याची शक्यता आहे. मी आधीपासूनच सांगत होतो की हा माणूस खोटारडा आहे. याच्या पोटात एक आणि ओठांवर एक असतं याचा प्रत्यय आज पुन्हा आला. आजच्या मुलाखतीतलं त्यांचं दुसरं वाक्य आहे ते म्हणतात मराठ्यांनो आता खुर्ची हिसकावण्यासाठी तयार राहा. आंदोलन आरक्षणासाठी चाललं होतं ना मग आता काय म्हणतात खुर्ची ओढण्यासाठी तयार राहा. अरे तुला खुर्चीच पाहिजे होती. त्याचं पहिल्या दिवसापासून नाटक खुर्चीसाठीच चाललं होतं. यांचे एक एक शब्द लक्षात ठेवा. या माणसाचा बेगडीपणा आणि लबाडपणा आता सगळ्यांसमोर आला आहे.
माझं मनोज जरांगेंना आव्हान आहे. सगेसोयरेमुळे मराठा समाजाची मुलं कशी कलेक्टर होणार? राज्यात फक्त 232 कलेक्टर आहेत करोडो कसे होणार. जरांगेंकडून फक्त भ्रम पसरवण्याचं काम केलं जात आहे. ज्याला सुरुवात असते त्याला शेवटही असतो. आता जरांगे यांचा शेवट सुरू झाला आहे, असा दावा अजय महाराज बारस्कर यांनी केला.
Manoj Jarange Patil : मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही