अजय महाराज बारस्करांची प्रहारमधून हकालपट्टी, जरांगेंवर टीका केल्यानं बच्चू कडूंचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
अजय महाराज बारस्करांची प्रहारमधून हकालपट्टी, जरांगेंवर टीका केल्यानं बच्चू कडूंचा मोठा निर्णय

Bachchu kadu Dismissed Ajay Baraskar : मराठा आंदोलनावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांची प्रहार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रहारचे सर्वेसर्वा आमदारच्चू कडूंनी (Bachchu Kadu) हा निर्णय घेतला. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत, त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, ते गुप्त मिटींगा घेतात, असा आरोप बारस्कर यांनी केला. त्यांची ही भूमिका मान्य नसून बारस्करांशी प्रहार संघटनेशी संबंध नाही, असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं.

बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव, जरांगेंचा पलटवार 

याबाबतचे अधिकृत पत्र आमदार बच्चू कडू यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन आणि मराठा आरक्षणावर कोणीही भूमिका मांडू नये, असे आदेश पत्रात दिलेत. त्याशिवाय, मराठा आरक्षणाविषयी बोलणाऱ्या अजय बारस्कर यांची प्रहार संघटना आणि प्रहार वारकरी संघटनेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती दिली.

जसच्या तसं पत्र –

सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित येतं की, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचा आदेश आहे की, पक्षामध्ये कोणीही मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाविषयी किवा इतर आरक्षण किंवा नेत्यांबद्दल कोणतीही भूमिका मांडू नये, असे केल्यास त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काहीही संबंध राहणार नाही.

पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊ कडू हेच स्वत: मांडतील. इतर कोणीही मा. अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये. आज दि. 21/02/2024 रोजी अजय अजय बारस्कर यांनी जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांचेविषयी मांडली त्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही किंवा काहीही संबंध नाही.

तरी अजय बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार संघटनेतून बडतर्फ बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी काहीही संबंध राहणार नाही, याची सर्वांना नोंद घ्यावी.

बारस्करांचे आरोप काय?
अजय बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवर टीका केली. ते म्हणाले, मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला आहे, तो मी खपवून घेणार नाही. लोक जरांगे यांना पाणी प्या सांगत होते, तेव्हा मी त्यांना पाणी द्यायला गेलो होतो. मात्र, त्यावेळी त्यांना वाटलं की, माझ्या हातातून पाणी प्यायल्याने मी मोठा होईल. म्हणून त्यांनी ते पाणी प्यायले नाहीत. संत फिंत गेले खड्यात असं ते म्हणाले. आजपर्यंत जरांगेंनी स्वत: सरकारला आरक्षणाच्या संदर्भात एकही पत्र दिलेले नाही. ते रोज पलटी मारतात, अशी टीका केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज